• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Arjun Teundulkar : अर्जुन तेंडुलकरने क्रिकेट करिअरबद्दल घेतला एक महत्वाचा निर्णय

August 21, 2026 by admin Leave a Comment

भारताचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेट कुठल्या टीमकडून खेळणार, या बद्दल विविध तर्क-वितर्क, अंदाज वर्तवले जात होते. पण अर्जुन तेंडुलकर गोवा टीमकडून खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. स्पोर्टस्टारने हे वृत्त दिलं आहे. अर्जुन तेंडुलकर ऑलराऊंडर असून आयपीएल 2026 मध्ये तो लखनऊ सुपर जायंट्स टीमकडून खेळला होता. गोव्याच्या टीमने ओमानचा दौरा केला. अर्जुन त्या टीममध्ये नव्हता. त्यामुळे तो गोव्याच्या टीमकडूनच खेळणार की अन्य दुसऱ्या टीमकडून या बद्दल विविध चर्चा, तर्क-वितर्क सुरु झाले होते. असोशिएशनमधील सूत्रांनी अर्जुन गोव्याच्या टीमकडूनच खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 2022-23 मध्ये अर्जुनने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी मुंबई ऐवजी गोव्याची निवड केली होती.

अर्जुन तेंडुलकर गोवा संघाचा नियमित सदस्य आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने 50 विकेट घेतले. त्याने आपल्या फलंदाजीवर मेहनत घेतली व गोवा टीमसाठी तो काही चांगल्या इनिंग खेळला. रणजी ट्रॉफीमध्ये राजस्थानसाठी त्याने शतक झळकावलं. सर्वच फॉर्मेटमध्ये गोवा टीमचा अर्जुन तेंडुलकर महत्वाचा भाग आहे. नेट आणि प्रॅक्टिस मॅचमध्ये गोलंदाजी करणाऱ्या अर्जुनला आपली क्षमता दाखवून देण्यासाठी आयपीएलमध्ये शेवटच्या सामन्यापर्यंत वाट पहावी लागली. LSG चा पंजाब किंग्सकडून पराभव झाल्यानंतर तेंडुलकरने एक भावनिक नोट लिहिली होती.

पहिल्या ओव्हरमध्ये टिच्चून बॉलिंग

“शाब्बास अर्जुन, या संपूर्ण सीजनमध्ये तू ज्या पद्धतीने तू स्वत:ला सावरलस त्याचा अभिमान वाटतो. शेवटच्या मॅचमध्ये संधी मिळेपर्यंत तू संयम ठेवलास, शांतपणे परिश्रम केलेस, क्षमतेवर विश्वास ठेवलास, सकारात्मक दृष्टीकोन बाळगलास” असं सचिनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलेलं. “कौशल्याइतकीच क्रिकेटमध्ये संयमाची परीक्षा होते आणि तू ते उत्तमरित्या हाताळलं. तुझे पाय जमिनीवरच राहूं देत. क्रिकेटवर सैदव प्रेम करत राहा” असं सचिनने मेसेजमध्ये म्हटलेलं. अर्जुन तेंडुलकरने पहिल्या ओव्हरमध्ये टिच्चून बॉलिंग केली. ऋषभ पंतने प्रभसिमरन सिंहची अवघड कॅच पकडली असती, तर पहिल्याच ओव्हरमध्ये त्याला विकेट मिळाला असता. 15 व्या ओव्हरमध्ये यॉर्कर चेंडूवर त्याला प्रभसिमरन सिंहचा विकेट मिळाला.

 

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in