
Anjali Damania on Bhondu Ashok Kharat: अजितदादांच्या विमान अपघातावरुन संशयकल्लोळ सुरू असतानाच त्यांच्या घराबाहेर काळी जादू अथवा अघोरी पूजा बांधल्याचा सातत्याने आरोप करण्यात येतो. याप्रकरणी अनेक दावे-प्रतिदावे आहेत. विमान अपघातापूर्वी असा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. याविषयी आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी दादांच्या घराबाहेर जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा अशोक खरात कुठे होता आणि तो काय करत होता. त्यादिवशी त्याच्या खात्यावर किती व्यवहार झाले याची वित्तंबातमी दिली आहे. काय म्हणाल्या अंजली दमानिया?
अभिजीत भांडे पाटील कोण?
सर्व राजकारणी आणि अधिकारी हे सतत खरातला मदत करत होते. पाठिशी घालत होते असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. आताही कल्पना खरात आणि हर्षवर्धन खरात यांना अटक झाली तर या मागचं सर्व षडयंत्र बाहेर येईल म्हणून त्यांना लपवलं जात आहे. त्यामुळेच अभिजीत भांडे पाटील यांना ताब्यात घेण्याची गरज आहे. अभिजीत पाटील आणि खरातमध्ये दोन कॉल झाल्याची माहिती दमानिया यांनी दिली.
२७ ते ३१ जानेवारी २०२६ या दिवसात समता पतसंस्थेत मोठी उलाढाल झाली होती. कोणत्या तारखेला कोणते मेसेज आले ही माहिती दिली होती. आता एक महत्त्वाची माहिती आहे. ज्या दिवशी अजित पवारांच्या घराच्या बाहेर, बारामतीच्या घराबाहेर भानामतीचे प्रकार झाले. त्या १७ तारखेला रात्री ठाण्यात आले होते. १८ चा पूर्ण दिवस ते ठाण्यात होते आणि ३४ सेकंदात सहा फायनान्शिअल ट्रॅंजेक्शन झाले. तेव्हा खरात ठाण्यात होते. ठाणे वेस्टला एका रेस्टॉरंटमध्ये होते. याची चौकशी काय आणि गुढ काय हे पोलिसांनी शोधायचं आहे, असे दमानिया म्हणाल्या.
अजित दादांच्या मृत्यूशी ट्रँजेक्शनचा संबंध?
मला तर नक्कीच वाटतो. ज्या दिवशी मी शोधलं मी आधी २७ ते ३१ चे ट्रॅंझेक्शन मांडले. त्यानंतर रोहित पवारांनी ट्विटरवर माहिती दिली की अजितदादांच्या घराबाहेर भानामतीचे प्रकार झाले. मी माध्यमातून ती तारीख शोधली. त्याच्यात मला खरातचं लोकेशन त्या दिवशी ठाण्यात असल्याचं दिसले. सहा ट्रँजेक्शन हे १८ तारखेला झाले आहेत. सहाचे सहा ३४ सेकंदात दिले आहेत. मी टॉवर लोकेशनही एसपीकडे दिले आहेत. दोन दिवसांपूर्वीच मी एसपींना ही माहिती दिली आहे, असे दमानिया यांनी सांगितले.
हा भानामतीचा प्रकार होता का?
मी कुणाशीही इंडिकेशन देत नाही. ते मीडियाने ठरवावं. मला त्यावर बोलायचं नाही, असे मत अंजली दमानिया यांनी मांडले. समता पतसंस्थेत सहा ट्रँजेक्शन ३४ सेकंदात झाली. किती रुपयांची झाली त्याची चौकशी करा. माहितीनुसार २७ ते २९ या तीन दिवसात ५ कोटी ३३ लाख रुपयांचे ट्रँजेक्शन झाले. म्हणजे ज्या दिवशी अजितदादा गेले त्या दिवशी ५ कोटी ३३ लाखांचे ट्रँजेक्शन झाले. तीन दिवसात. ३० आणि ३१ जे झाले त्या छोट्या होत्या. तीन दिवसात ५ कोटी ३३ लाखाच्या झाल्या. त्या कुणाच्या झाल्या. कुणाकडून कुठून झाल्या. ईओडब्ल्यूने अजून चौकशी का केली नाही. ईडीच्या अंतर्गत येत नाही. इकॉनॉमिक्स ऑफेन्स विंगने याची चौकशी करावी, अशी मागणी दमानिया यांनी केली.
Leave a Reply