• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट

July 17, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीतील जंतरमंतरवर पर्यावरण तज्ज्ञ आणि ज्येष्ठ संशोधक सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू असून, या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा वाढताना दिसत आहे. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे उद्या दिल्लीत जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहेत. सोनम वांगचुक गेल्या २० दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषण करत आहेत. त्यांनी नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात कारवाईची मागणी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या आंदोलनाला समाजातील विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून, अनेक नेत्यांनीही उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे उद्या सकाळी दिल्लीत जाऊन सोनम वांगचुक यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी क्रांतिकारी जनशक्ती पक्षाचे नेते अभिजित दीपकेही उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

उपोषणामुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली असून, त्यांचे वजन सुमारे ८ ते ९ किलोने घटल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असून, केंद्र सरकारवरही विरोधकांकडून टीका होत आहे.

याआधी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही जंतरमंतर येथे जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली होती. त्यामुळे या आंदोलनाला आता विविध राजकीय पक्षांकडून मिळणाऱ्या पाठिंब्याकडे देशाचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in