• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Akshaye Khanna : ‘धुरंधर’ नंतर पुन्हा खतरनाक अंदाजात दिसणार अक्षय खन्ना, 24 ऑगस्टला मिळणार मोठं सरप्राईज ?

August 19, 2026 by admin Leave a Comment


2024 साली ‘हनु-मान’ सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक प्रशांत वर्मा हे पुन्हा एकदा दर्शकांसाठी एक खास आणि मोठं सरप्राईज घेऊन येत आहेत. त्यांच्या ‘महाकाली’ या चित्रपटाबद्दल सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे मेकर्स आरकेडी स्टूडिओजने ‘24 ऑगस्ट – द एंड बिगिन्स’ असं लिहीत इंटरनेटवर उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. मात्र ही पोस्ट समोर येताच चाहत्यांमध्ये प्रचंड कुतूहल असून 24 ऑगस्टला नेमकं काय होणार, हे जाणून घेण्याची सर्वांनाच इच्छा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 24 ऑगस्टला या चित्रपटातून बॉलिवूडमधील अतिशय हरहुन्नरी, टॅलेंटेड अभिनेता अक्षय खन्नाचा (Akshaye Khanna) पहिला लूक रिलीज होणार आहे. अक्षय खन्नाने ‘धुरंधर’मध्ये ‘रहमान डकैत’ची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केलं. त्याचा रफ-टफ आणि दमदार अंदाज पाहून चाहते आधीच थक्क झाले होते. पण आता हाच अक्षय एका अशा भूमिकेत दिसणार आहे, ज्याची कुणी कदाचित कल्पनाही केली नसेल. हो, हे खरं आहे, प्रशांत वर्मा यांच्या बहुप्रतिक्षित ‘महाकाली’मध्ये अक्षय आता एका भन्नाट आणि रहस्यमय अवतारात दिसणार आहे. आणखी 4-5 दिवसांनी म्हणजेच 24 ऑगस्टला अक्षय खन्नाचा ‘महाकाली’मधील पहिला लूक रिलीज होऊ शकतो. विशेष म्हणजे या लूकमध्ये अक्षयला ओळखणंही चाहत्यांसाठी मोठं आव्हान ठरू शकतं. त्याचा मेकओव्हर इतका जबरदस्त आणि वेगळा असल्याची चर्चा आहे की पहिल्या नजरेत हा अक्षय खन्नाच आहे, यावर विश्वास ठेवणंही अनेकांना कठीण जाईल!

 

 

View this post on Instagram

 

A post shared by RKD Studios (@rkdstudios)

शुक्राचार्य बनून अक्षय खन्ना करणार कमाल !

‘महाकाली’मध्ये अक्षय खन्ना असुरांचे गुरु शुक्राचार्य यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. पौराणिक कथांमध्ये शुक्राचार्य हे अत्यंत ज्ञानी, शक्तिशाली आणि रहस्यमय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ही भूमिका अक्षयच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात वेगळ्या भूमिकांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. अक्षय खन्नासारखा कसलेला अभिनेता जेव्हा शुक्राचार्यांसारखी जटिल भूमिका साकारतो, तेव्हा पडद्यावर नेमकं काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता नक्कीच वाढते. त्याच्या अभिनयातील गांभीर्य आणि व्यक्तिरेखेला मिळणारी खोली या भूमिकेला आणखी खास बनवू शकते. त्यामुळे हा पहिला लूक पाहण्यासाठी सर्वच सिनेप्रेमी उत्सुक असतील हे नक्की.

‘महाकाली’हा चित्रपट आर.के. दुग्गल हे सादर करणार असून त्याची निर्मिती रिवाज रमेश दुग्गल यांच्या बॅनरखाली केली जात आहे. चित्रपटाची मूळ कथा आणि संकल्पना प्रशांत वर्मा यांची असून, पूजा अपर्णा कोल्लुरू या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात फक्त अक्षय खन्ना नव्हे तर त्याच्यासोबत भूमी शेट्टी, रोहित सराफ यांच्यासह अनेक दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे स्टारकास्टपासून ते कथानकापर्यंत, ‘महाकाली’कडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in