
चाकण एमआयडीतील अनेक कंपन्या बंद पडल्यावरून वातावरण तापले आहे. अनेक पायाभूत सुविधांचा अभावामुळे कंपन्या बंद पडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शरद पवारांपासून ते अनेक दिग्गजांनी त्यावर चिंता व्यक्त केली आहे. तर आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यापूर्वी उद्धव सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी चाकण एमआयडीसीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी येथील सोयी-सुविधांच्या अभावावर कडाडून टीका केली. त्याचवेळी माध्यमांशी बोलताना त्यांना अचानक अन्न आणि औषध प्रशासनाचे तडफदार आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची आठवण आली. काय म्हणाले आदित्य ठाकरे?
तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी चाकणमध्ये आणा
सर्व रस्त्यांची वाट लावुन ठेवली आहे. एखाद्या दिवशी या आणी इथं फिरा. नाशिकमध्ये सर्व सत्ताधारी आमदार आहेत. आमदार बोलतात आमचे कोणी ऐकत नाही. उद्योगमंत्री यांच्या अवतीभोवती अनेक टोलनाके आहे. राज्यात इंफ्रालॉस झाला आहे ते थांबले पाहिजे. उद्योजकांच्या अडचणी ते जाहीरपणे बोलत होते. लोकांना 2 3 तास लागताय कामाला यायला. आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. पुढच्या शिप्टमध्येही परिणाम होतो, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
गेल्या 5 वर्षात स्थिती बिघडलेली आहे. 14 लोकांमागे 1 अधिकारी द्या. कंपनी त्यांच्या प्लांटमध्ये पैसे गुंतवणार कि रस्त्यात? असा सवाल करत चाकणमध्ये तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी द्या, अशी मोठी मागणी आदित्य ठाकरे यांनी सरकारकडे केली. गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासनात विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून मुंडे यांनी जोरदार कामगिरी केली आहे. असाच अधिकारी एमआयडीसीसाठी हवा अशी मागणी आता ठाकरे यांनी केली आहे.
अनेकांना जीव गमवावा लागला आहे. स्पेशल केस पक्त तुमच्या लोकांसाठी होणार का? दादांच सर्व लक्ष असायचे, असे ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री यांचे लक्ष कुठे आहे, असा सवाल करत काम फक्त त्यांच्या लोकांसाठी करतात का, असा सवाल केला. चाकण एमआयडीसीच्या प्रश्नांवर आदित्य ठाकरेंनी आआज थेट प्रत्यक्ष पाहणी केली. चाकण MIDC मधील वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांचा अभाव आणि उद्योजकांच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे आज चाकण दौऱ्यावर आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत येण्याच्या एक दिवस अगोदर आदित्य ठाकरे चाकणच्या दौऱ्यावर आले आहेत.
त्यांनी यावेळी हुंडाई चौक, वासुली फाटा, कोरेगाव फाटा, आंबेठाण, बिरदवडी, वाघजाईनगर, अहमदनगर फोर्जिंगसह महाळुंगे कमान आणि पुलाची पाहणी केली. उद्योगांचे संभाव्य स्थलांतर रोखण्यासाठी उद्योजकांशी थेट संवाद साधला. सर्वकडच्या कंपन्या स्थलांतरीत होत आहे. ऑटो हब मध्ये ऑटो येणार कशा असा सवाल त्यांनी केला. भाजपच्या राजवटीत होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे सर्व कंपन्यांचे स्थलांतरण होत आहे. इंडस्टी खात्यात असे लोक आहे त्यांना घरचा टॅक्स भरावा लागतो. टॉवरमध्ये कोणाचे ऑफीस आहे. 1500 रुपये स्केअर मिटरचा रेट आहे, असा सवाल ठाकरे यांनी केला.
Leave a Reply