• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Adinath Kothare : उर्मिला कानेटकरसोबत घटस्फोट, महिन्याभरातच आदित्य कोठारेची नवीन सुरुवात, पोस्ट चर्चेत

August 18, 2026 by admin Leave a Comment


Adinath Kothare : झगमगत्या विश्वात कधी कोणाचं नातं जुळेल आणि कधी कोणाचं नातं मोडेल… याबद्दल काहीही सांगता येत नाही. अभिनेता आदित्य कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या घटस्फोटाची माहिती समोर अल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. नुकताच, आदित्य आणि उर्मिला यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. आता आदिनाथ पुन्हा त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर अभिनेत्याने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. पोस्टच्या माध्यमातून खुद्द आदिनाथ याने मोठी अपटेड दिलीये.

घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर महिन्याभरातच आदिनाथ याने पुन्हा पोस्ट करत मोठी अपडेट दिली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर Coming Soon अशी पोस्ट केली आहे. अभिनेत्याच्या पोस्टनंतर चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, आदिनाथ कोठारे लवकरच नव्या मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by We@KothareVision (@kotharevision)

 

आदिनाथ कोठारे याची नवीन मालिका झी मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे. पण मालिकेचं नाव समोर आलेलं नसून आदिनाथ याच्या भूमिकाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेत अभिनेत्री कोण असेल आणि अन्य कोणते कलाकार असतील याबद्दल देखील चाहत्यांची मनातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘काहीतरी घेऊन येत आहोत खास… #StayTuned #comingsoon’, असं लिहिलं आहे. चाहत्यांनी देखील अभिनेत्याच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. आदिनाथ याने मराठी सिनेविश्वात स्वतःचं नाव मोठं केलं आहे. आता तो बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची ओळख भक्कम करताना दिसत आहे आता ‘रामायण’ या सिनेमातून आदिनाथ महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आदिनाथ आणि उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट 

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आदिनाथ आणि उर्मिला यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांच्या उपस्थितीत दोघांचं लग्न पार पडलं. लग्नानंतर त्यांनी मुलीचं देखील जगात स्वागत केलं. पण आदिनाथ आणि उर्मिला यांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2022 पासून आदिनाथ आणि उर्मिला विभक्त राहत असल्याची माहिती समोर आली.

 

 

 

 





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in