• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhijeet Dipke: तो महाराष्ट्रतील एक बौद्ध…भाजपा केंद्रीय मंत्र्याने अभिजीत दिपके यांना पुन्हा एकदा सुनावलं

August 18, 2026 by admin Leave a Comment


Abhijeet Dipke CJP: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सुरुवातीला जंतर मंतर आंदोलनातून उदयास येत असलेल्या तरुण नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अभिजीत दीपके हे महाराष्ट्राचे रहिवासी असूनही आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ” असे ते म्हणाले होते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हणाले होते की, “कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके हे आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मंत्र्यांनी अभिजीत दीपके यांच्या विद्यार्थी असण्याच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता मात्र त्यांनी थेट पलटी मारली आहे.

रिजिजू म्हणाले की”अभिजीत दीपके हा आपलाच मुलगा आहे, महाराष्ट्रातील एक बौद्ध, पण तो आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आहे, हे तुम्हाला माहीत आहे, सर्वांना माहीत आहे… तो विद्यार्थी कसा झाला?” ” विरोधी पक्षांवर, विशेषतः आम आदमी पार्टीवर (आप) निशाणा साधताना रिजिजू म्हणाले की, “जेव्हा राजकीय पक्ष हरतात, तेव्हा ते विद्यार्थ्यांच्या नावाखाली राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात, जे लोकशाहीसाठी चांगले नाही. त्यांनी यावरही जोर दिला की, एवढ्या मोठ्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी पूर्ण शांतता आणि सुव्यवस्था राखली होती आणि एकही व्यक्ती जखमी झाली नाही, तर दुसरीकडे विरोधी पक्ष सरकारकडून विद्यार्थ्यांवर दडपशाही होत असल्याचा खोटा वृत्तांत विनाकारण रचण्याचा प्रयत्न करत आहे.”

#WATCH | Delhi: On the young leadership that has emerged from the protest at Jantar Mantar, Parliamentary Affairs Minister Kiren Rijiju says, “The students’ concerns are valid, but the attempt by the Aam Aadmi Party and others to hijack the situation is not right. Abhijeet Dipke… pic.twitter.com/i1rHxRrDcs

— ANI (@ANI) August 18, 2026

अभिजीत दीपके हे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत, ज्या पक्षाने गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियावर Gen-Z चा मोठा चाहतावर्ग मिळवला आहे. अभिजीत दिपके सध्या ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या दुरावस्थांवर प्रश्न उपस्थित करत आहे. सध्या तो स्कूल ठीक करो या मोहिमे अंतर्गत गावोगावी फिरुन सरकारी शाळेचे प्रश्न सोडवण्यावर भर देत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्यांने सरकारी शाळा ज्या समस्यांचा सामना करत आहे ते दाखवले. 15 ऑगस्ट 2026 ला ते हिंगोलीतील एका शाळेत ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी शाळेत कोणकोणत्या समस्या आहेत याबद्दल विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in