• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhijeet Dipke: तो फोन आला अन् अभिजीत दीपकेला कोसळले रडू, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

August 18, 2026 by admin Leave a Comment


दिल्ली येथील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला. कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके या विद्यार्थ्यांशी आंदोलन संपल्यानंतर सतत संपर्कात असल्याचे दिसत आहे. अभिजीत दीपके पश्चिम बंगालमधील सीजेपी स्वयंसेवक अब्दुल हफीजच्या यांच्या दु:खात सहभागी झाल्याचे दिसत आहे. अब्दुलच्या वडिलांची एका हल्ल्यात हत्या झाली. त्यानंतर अभिजीत दीपकेने त्याच्याशी संवाद साधला. तसेच दीपके यांनी या प्रकरणी भाजप सदस्यांवर आरोप केला. दरम्यान, अब्दुलशी बोलताना अभिजीत दीपकेला रडू कोसळले आहे.

बाँकुरा जिल्ह्यात अब्दुलच्या घरी सोमवारी, १७ ऑगस्ट रोजी सीजेपीचे सह-संयोजक आशुतोष रांका पोहोचले. रांका आणि इतर सदस्यांच्या उपस्थितीत दीपके यांनी अब्दुलशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. पोलिसांनी या प्रकरणात आठ जणांना अटक केली आहे. भाजपने हल्ल्याशी कोणताही संघटनात्मक संबंध नाकारला आहे.

Spoke to Abdul, whose father was murdered by BJP members.

While talking to him, I broke down. But it was Abdul who gave me strength and said, “Tootna nahi hai… Humein school theek karne hain. Papa chale gaye, lekin hum school theek karke rahenge.”

Abdul, mere bhai, I am deeply… pic.twitter.com/tw29Xcm6dT

— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) August 17, 2026

‘आता तुम्ही आमची जबाबदारी आहात’

अभिजीत दीपके व्हिडीओ कॉलवर बोलताना म्हणाले की, “आता तुम्ही आमची जबाबदारी आहात.” सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अब्दुलशी संवाद साधतानाचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, “आम्ही नेहमी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहू. या लढाईत तुम्ही एकटे नाही आहात.” व्हिडिओ कॉलवर दीपके म्हणाले, “आता तुम्ही आमची जबाबदारी आहात.” दरम्यान, अब्दुलशी बोलताना अभिजीत दीपके भावुकही झाले आहेत.

‘पप्पा गेले, पण आम्ही शाळा ठीक करत राहू’

अभिजीत दीपके यांनी सांगितले, “मी अब्दुलशी बोललो. त्याच्या वडिलांची हत्या भाजप सदस्यांनी केली होती. त्यांच्याशी बोलताना मला रडू कोसळले, पण अब्दुलने मला हिंमत दिली आणि म्हटले की तुटायचे नाही. आम्हाला शाळा ठीक करायची आहे. पाप्पा गेले, पण आम्ही शाळा ठीक केल्याशिवाय राहणार नाही.”

‘देशाला तुमच्यासारख्या मुलाचा अभिमान आहे’

अभिजीत दीपके यांनी पुढे लिहिले की, “अब्दुल, माझा भाऊ, तुमचे धैर्य तुमच्या वडिलांनी दिलेल्या मूल्यांचे आणि शक्तीचे प्रतिबिंब आहे. त्यांना गमावल्यानंतरही तुम्ही इतरांना शक्ती आणि धैर्य देत आहात. देशाला तुमच्यासारख्या मुलाचा अभिमान आहे. द्वेषामुळे झालेल्या या गुन्ह्यात आपल्या वडिलांना गमावल्यानंतरही, तुम्ही आपल्या परिसरातील शाळा सुधारण्यासाठी आणि इतर मुलांचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी दृढसंकल्पित आहात.”





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in