
Aaradhya Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन यांची एक खास कौटुंबिक झलक सध्या चर्चेत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने ऐश्वर्या तिच्या माहेरी, म्हणजेच वृंदा राय यांच्या घरी पोहोचली. या खास कौटुंबिक सोहळ्यात आराध्याने तिला मामेभावांना राखी बांधली. या सेलिब्रेशनचा फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहत्यांचं लक्ष या मायलेकीच्या खास क्षणाकडे वेधलं गेलं आहे. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण. याच निमित्ताने आराध्या तिच्या आईसोबत आजीच्या घरी गेली होती. तिथे तिने तिचे मामेभाऊ विहान आणि शिवांश राय यांना राखी बांधली. त्यानंतर सर्वांनी एकत्र फोटोही काढले. या फोटोमध्ये आराध्या आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदी दिसत आहे.
आराध्याच्या या कौटुंबिक सेलिब्रेशनची झलक समोर येणं विशेष मानलं जात आहे. कारण बच्चन कुटुंबातील सदस्य त्यांच्या खासगी आयुष्याबाबत फारसं सोशल मीडियावर शेअर करत नाहीत. त्यामुळे ऐश्वर्या आणि आराध्याचा कुटुंबासोबतचा हा फोटो चाहत्यांसाठी लक्षवेधी ठरला. समोर आलेल्या फोटोमध्ये ऐश्वर्या राय तिची आई वृंदा राय, भाऊ आदित्य राय आणि इतर कुटुंबीयांसोबत दिसत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. अभिनेत्रीची वहिनी श्रीमा रायने हा खास कौटुंबिक क्षण सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पहा फोटो-
View this post on Instagram
आराध्याच्या हेअरस्टाइलचीही चर्चा
या फोटोमध्ये आराध्याच्या लूकनेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या नव्या हेअरस्टाइलची सोशल मीडियावर चर्चा होत असून, चाहत्यांनी तिच्या बदललेल्या लूकचं कौतुक केलं आहे. आराध्या नेहमीच आई ऐश्वर्यासोबत सार्वजनिक ठिकाणी दिसते आणि तिच्या प्रत्येक फोटोची सोशल मीडियावर चर्चा होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने समोर आलेली ही कौटुंबिक झलक मात्र ग्लॅमरपेक्षा कुटुंबातील प्रेम आणि आपुलकी दाखवणारी ठरली आहे.
आराध्या ही सोशल मीडियावर सर्वाधित चर्चेत असलेली स्टारकिड आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल होतात आणि त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत असतात. आता रक्षाबंधनच्या या फोटोतही आराध्याच्या लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. तिच्या लूकमधील साधेपणा अनेकांना विशेष भावला आहे.
(@shrimarai)
Leave a Reply