• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांना जॅकपॉट, 18000 हून थेट 69000 रुपये वेतन? नवीन गणित तरी काय?

August 1, 2026 by admin Leave a Comment


8 व्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांना लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचे किमान वेतन 18,000 रुपयांहून थेट 69,000 रुपये करण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेत आला आहे. याविषयीची मागणी करण्यात येत असल्याने चर्चा वाढली आहे. अनेक कर्मचारी संघटनांनी सरकारकडे 3.833 फिटमेंट फॅक्टरची आग्रही मागणी धरली आहे. पण मूळ वेतनाचा 69,000 हा आकडा केवळ फिटमेंट फॅक्टरवर आधारीत नाही. काय यामागील ते गणित? खरंच इतका पगार वाढणार का?

किमान 69,000 रुपयांचे गणित समजून घ्या

राष्ट्रीय परिषद- संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या (NC-JCM) कर्मचारी पक्षाने किमान वेतनात, मूळ वेतनातील बदलाची आग्रही मागणी केली आहे. केवळ फिटमेंट फॅक्टर हा घटक ग्राह्य धरण्याऐवजी इतर गोष्टींचा आधार घेण्याची मागणी करण्यात आली आहे. वाढती महागाई आणि उंचावलेले जीवनमान यासाठी लागणारा खर्च पाहता काही सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रस्तावात एनसी-जेसीएमने कुटुंबाचा आकार, घर, खाणे-पिणे, विद्युत, पाणी, इंधन आणि विकास कौशल्यासाठी लागणारा खर्च पुन्हा नव्याने जोडण्याची मागणी करण्यात आली आहे.

69,000 रुपये मूळ वेतनासाठी युक्तीवाद काय?

NC-JCM च्या कर्मचारी गटाने दिलेल्या निवेदनानुसार, किमान वेतन निश्चित करण्यासाठी सध्याचे सूत्र, फॉर्म्युला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, खर्चासाठी अजिबात पुरेसा नाही. कुटुंबाचा आकार बदलला आहे. 7 व्या वेतन आयोगाने वेतन निश्चित करताना 3 सदस्यीय कुटुंब ग्राह्य धरले होते. यामध्ये कर्मचारी, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश होता. पण आता ही सदस्यसंख्या पाच युनिट करणे गरजेचे आहे. आई-वडिलांचाही समावेश कुटुंबात करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्याचे आई-वडीलच नाही तर सासू-सासऱ्यांचाही त्यात समावेश असावा. त्याच आधारे मूळ वेतन निश्चित करण्यात यावे.

3.833 फिटमेंट फॅक्टरची चर्चा

सहा सदस्यीय कुटुंबाची आग्रही मागणी करण्यात आली आहे. त्याआधारे NC-JCM ने कर्मचारी वर्गासाठी किमान 69,000 रुपये वेतनाची मागणी केली आहे. सध्या किमान वेतन 18,000 रुपये इतके आहे. मूळ वेतन 69,000 रुपयांपर्यंत वाढवल्यास फिटमेंट फॅक्टर 3.833 इतके होते. यामुळे सरकारला फिटमेंट फॅक्टरमध्ये सुद्धा सुधारणाक करावी लागणार आहे. सध्या 2 ते 2.5 असे फिटमेंट फॅक्टर चर्चेत आहे. त्यापेक्षा ही मागणी अधिक आहे. 7 व्या वेतन आयोगात 2.57 हा फिटमेंट फॅक्टर होता. तज्ज्ञानुसार, महागाई आणि आर्थिक परिस्थिती पाहता वेतन आयोगात 2.15 असे गुणोत्तर फिटमेंट फॅक्टर असू शकते. तर देशातील विविध कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 3.83 करण्याची आग्रही मागणी केलेली आहे. औद्योगिक कामगारांसाठी महागाई निर्देशांक (AICPI-IW) आधारे फिटमेंट फॅक्टर ठरतो. नवीन वेतन आयोगाने ही शिफारस ग्राह्य धरल्यास कर्मचाऱ्यांना मोठा जॅकपॉट लागू शकतो.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in