• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

50 हजार डाऊन पेमेंट, Alto K10 घरी घेऊन जा, ईएमआय किती भरावा लागणार?

August 16, 2026 by admin Leave a Comment


छोट्या कुटुंबासाठी बजेट फ्रेंडली म्हणून मारुती सुझुकीची अल्टो के 10 लोकप्रिय आहे. अनेक चौकोनी कुटुंबाची ती पहिली पसंती आहे. कमी खर्चात चारचाकी हवी असेल तर Maruti Suzuki Alto K10 किफायतशीर आहे. सर्वात खास बाब म्हणजे या कारमध्ये 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत. या कारच्या समोरील भागात ड्युएल एअरबॅग मिळते. जर तुम्ही या कारसाठी 50 हजार डाऊन पेमेंट केल्यावर ईएमआय किती भरावा लागणार? जाणून घ्या अपडेट…

मारुती सुझुकीची अल्टो के 10 ची किंमत किती?

Maruti Alto K10 ची एक्स शोरूम किंमत 3.70 लाख रुपये सुरू होती. दिल्लीमध्ये या चारचाकी ऑनरोड किंमत जवळपास 4.16 लाख रुपयांच्या घरात आहे. या किंमतीत एक्स-शोरूम किंमतीशिवाय RTO, इन्शुरन्स आणि इतर शुल्काचा समावेश आहे. यामुळे प्रत्येक शहरात या किंमतीत बदल होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या शहरातील किंमत अगोदर विचारून घ्या.

50 हजार रुपये डाऊन पेमेंट

जर एखादा ग्राहक जवळपास 50 हजार रुपयांचं डाऊन पेमेंट करत असेल तर जवळपास 3.74 लाख रुपयांचे वाहन कर्ज त्याला घ्यावे लागेल. बँकांचे व्याज दर आणि कर्जाचा कालावधी या आधारावर प्रत्येक महिन्याचा हप्ता ठरतो. जर 3.74 लाख रुपयांच्या कर्जावर अंदाजे 9.8 टक्के दराने 4 वर्षांसाठी कर्ज घेतले तर 9 हजार रुपये प्रति महिना ईएमआय भरावा लागेल. या हिशोबाने तुम्हाला बँकेला एकूण जवळपास 4.53 लाख रुपये चुकते करावे लागतील. ईएमआय बँकेचा व्याजदर, प्रक्रिया शुल्क, कर्जाची अट आणि डाऊन पेमेंट आधारे बदलू शकते.

Maruti Alto K10 चे खास फीचर्स

Alto K10 मध्ये आता सुरक्षेचे फीचर्स जोडण्यात आले आहे. कारमध्ये आता 6 एअरबॅग देण्यात आले आहेत. या कारमध्ये सीट बेल्ट आणि सुरक्षा पुरवण्यात आल्याने सामान्यांची ही कार पसंतीला उतरत आहे. कारच्या मॅकनिकल सेटअपमध्ये मोठा बदल करण्यात आलेला नाही. Alto K10 मध्ये 998cc K10C पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 5,500 rpm वर 49 kW ची पॉवर आणि 3,500 rpm वर 89 Nm चे टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 5-स्पीड मॅनुअल ट्रांसमिशन देण्यात आले आहे.

Alto K10 केवळ पेट्रोल इंजिनसोबत येत नाही. तर CNG पर्यायासह उपलब्ध आहे. कारमध्ये 27 लिटर इंधन टाकी आहे. ज्यांना रोज दूरचा प्रवास करावा लागतो. त्यांच्यासाठी सीएनजी हा चांगला पर्याय ठरू शकतो. Alto K10 चा कॉम्पॅक्ट आकार शहरातील गर्दीतून मार्ग काढण्यासाठी फायदेशीर ठरतो. कार पार्किंगसाठी ही कार सोयीस्कर आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in