• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

5 लाखांच्या गुंतवणूकीवर मिळतील चक्क 7.25 लाख! पोस्ट ऑफीसची योजना भारी

August 15, 2026 by admin Leave a Comment


Post Office TD Scheme: जर तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करु इच्छीता ज्यात फिक्स्ड डिपॉझिट सारखे व्याज मिळेल, परंतू बँकेच्या जागी पोस्ट ऑफीसची निवड करु इच्छीता, तर पोस्ट ऑफीस टाईम डिपॉझिट म्हणजेच ( Post Office Time Deposit – TD ) तुमच्यासाठी एक चांगले ऑप्शन होऊ शकते. यात तुम्ही गरजेच्या नुसार १ ते ५ वर्षांपर्यंत पैसे जमा करु शकता.

किती वर्षांसाठी किती व्याज ?

Post Office TD मध्ये वेगवेगळ्या वर्षांसाठी किती व्याज ?

1 वर्षांची TD: 6.9% वार्षिक व्याज

2 वर्षांची TD: 7.0% वार्षिक व्याज

3 वर्षांची TD: 7.1% वार्षिक व्याज

5 वर्षांची TD: 7.5% वार्षिक व्याज

म्हणजे सर्वात जास्त व्याज ५ वर्षांच्या TD वर मिळते.

Bank FD आणि Post Office TD मध्ये फरक काय ?

या योजनेच्या व्याजाची मोजणी दर तिमाहीला केली जाते. परंतू व्याजाची रक्कम वार्षिक केली जाते. बँक एफडीत व्याज दर काळानुसार बदलू शकतात. बँक आरबीआयच्या धोरणानुसार व्याज दरात बदल करते.मात्र, एफडी सुरु करताना जे व्याज दर निश्चित असते. ते सर्वसाधारण त्या एफडीच्या कालावधी साठी लागू असते.

Post Office TD त गुंतवणूक करताना व्याजदराच्या हिशेबाने रिटर्न मिळते. त्यामुळे गुंतवणूक करताना त्या वेळेचे व्याज पाहूनच गुंतवणूक करावी.

5 वर्षांच्या TD वर मिळू शकतो टॅक्स बेनिफिट्स

Post Office TD मध्ये केवळ 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीने सुरुवात करता येते. यानंतर तुम्ही १०० रुपयांच्या पटीत कितीही रक्कम जमा करु शकता. या योजनेत गुंतवणूकीचा कोणतीही कमाल मर्यादा नसते. जर तुम्ही ५ वर्षांची टीडी निवडली तर Income Tax Act के Section 80C नुसार कर सवलत मिळू शकते. मात्र, टॅक्स नियमानुसार मिळणारी सुट आणि त्याची मर्यादा गुंतवणूक करण्याच्या आधी जाणून घ्या.

मॅच्युरिटीनंतर वाढवू शकता कालावधी –

Post Office TD चा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तिला पुढे वाढवण्याचा पर्याय देखील मिळतो.

1 वर्षांच्या TD ला 6 महिन्यांपर्यंत वाढवता येते…

2 वर्षांच्या TD ला 12 महिन्यांपर्यंत वाढवता येते..

3 आणि 5 वर्षांच्या TD ला 18 महिन्यांपर्यंत वाढवता येते..

यात सिंगल आणि जॉइंट दोन्ही प्रकारची खात उघडण्याची सुविधा मिळते. म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनुसार एकट्याने किंवा अन्य व्यक्ती सोबत खाते उघडू शकता.

5 लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज ?

जर तुम्ही एक वर्षांच्या मुदतीसाठी टीडीत 5 लाख जमा करत असाल तर हिशेबानुसार 33,301 व्याज मिळू शकते. तसेच 3 वर्षांसाठी 5 लाख जमा करत असाल तर मच्युरिटीनंतर एकूण रक्कम 6,17,538 होऊ शकते. म्हणजे 1,17,538 व्याजापोठी मिळते.

जर पाच लाख रुपये संपूर्ण 5 वर्षांसाठी गुंतवले तर ही रक्कम वाढून सुमारे 7,24,974 होऊ शकते. म्हणजे तुम्हाला या काळाचे 2,24,974 व्याज मिळू शकते.

तुमच्यासाठी का खास Post Office TD?

Post Office Time Deposit त्या लोकांसाठी खास पर्याय असतो जे त्यांच्या पैशांवर आधीच निश्चित केलेल्या व्याजानुसार परतावा मिळवू इच्छीतात आणि  बाजारातील चढउताराची जोखीम घेऊ इच्छीत नाहीत. खास करुन ५ वर्षांच्या टीडीतून मिळणाऱ्या कर सवलतीचा लाभ या योजनेला आणखीन आकर्षक बनवतो. मात्र, गुंतवणूक करण्याच्या आधी टॅक्स नियम आणि आपल्या गरजेप्रमाणे स्कीमच्या अटी जाणून घ्याव्यात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in