• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

30 हजार कोटींच्या संपत्ती प्रकरणात करिश्माच्या मुलांना दिलासा मिळताच करीना स्पष्ट म्हणाली..

May 1, 2026 by admin Leave a Comment


दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेत्री करिश्मा कपूरच्या मुलांना प्रिया सचदेव कपूरच्या विरोधात सुरू असलेल्या संपत्तीच्या वादात अंतरिम दिलासा दिला आहे. करिश्माचा पूर्व पती संजय कपूरचं गेल्या वर्षी निधन झालं, तेव्हापासून त्याच्या संपत्तीचा हा वाद कोर्टात सुरू आहे. गुरुवारी न्यायालयाने संजयच्या संपत्तीबाबत आहे ती स्थिती कायम ठेवण्याचे आणि प्रियाचा हस्तक्षेप करण्यापासून रोखण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर करिश्माची बहीण आणि अभिनेत्री करीना कपूरची पोस्ट चर्चेत आली आहे. करीनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे.

काय आहे करीनाची पोस्ट?

‘..आणि अखेर प्रकाश आहे. न्याय आणि सत्याचा नेहमीच विजय होईल’, अशी पोस्ट करीनाने लिहिली आहे. संजय कपूरच्या 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून हा वाद सुरू आहे. संजयचं गेल्या वर्षी लंडनमध्ये पोलो खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झालं होतं. तेव्हापासून त्याच्या संपत्तीवरून आई राणी कपूर, पूर्व पत्नी करिश्मा कपूर, करिश्मा-संजयची दोन मुलं आणि तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर यांच्यात कोर्टात वाद सुरू आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने अकाऊंट स्टेटमेंट्स सादर करण्याचे निर्देश दिले असून संजय कपूरच्या परदेशी बँक खात्यांच्या आणि क्रिप्टोकरन्सी होल्डिंग्जच्या व्यवहारांवरही निर्बंध घातले आहेत. मालमत्तेचं जतन करणं आवश्यक असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. विशेष म्हणजे या प्रकरणाचा निकाल लागण्यास वेळ लागणार असल्याने न्यायालयाने पुढे असंही नमूद केलं की, याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांचं निराकरण मुख्य प्रतिवादी प्रिया सचदेव कपूरने केलं पाहिजे. संजय कपूरच्या मृत्यूपत्राच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित करत करिश्माच्या दोन्ही मुलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी 2003 मध्ये लग्न केलं होतं. परंतु 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांना दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतर संजय प्रिया सचदेवशी लग्न केलं. आपल्या मुलांच्या वतीने करिश्माने असा आरोप करत खटला दाखल केला की, प्रियाने बनावट मृत्यूपत्र तयार केलं असून तिच्या मुलांना वारसा हक्कातून वगळण्यात आलं आहे. संजय हा खूप मोठा उद्योगपती होता. तो सोना कॉमस्टार या कंपनीचा तो अध्यक्ष होता. जून महिन्यात पोलो खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचं निधन झालं होतं. संजयची संपत्ती तब्बल 30 हजार कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अंगावर पेट्रोल ओतलं अन्…भूविकास बँकेच्या महिला कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल…महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात एकच खळबळ
  • Raja Shivaji FIRST Review: रितेश देशमुखच्या करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी, जाणून घ्या कसा आहे सिनेमा
  • मृत्यूच्या विळख्यातही सुटली नाही मायेची साथ! 12 तास काळजाला चिटकून राहिले माय-लेक, काळीज पिळवटून टाकणारी घटना
  • Petrol-Diesel Price: टॅक्स आला अर्ध्यावर…1 मे रोजी आनंदवार्ता, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
  • Jasprit Bumrah : काय दिवस आले? जोफ्रा आर्चरकडून शिक, जसप्रीत बुमराहला भारताच्या मोठ्या खेळाडूचा सल्ला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in