• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

30 रुपयात 142 किमी दामटा, Ampere च्या या इलेक्ट्रिक स्कूटरची जोरदार चर्चा, किंमत आणि फीचर्स काय?

August 15, 2026 by admin Leave a Comment


Ampere ची इलेक्ट्रिक स्कूटर Magnus G Max स्कूटरमध्ये NxG.io सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मद्वारे कनेक्टिव्हिटी अपग्रेड करण्यात आली आहे. कंपनीने नवीन फीचर्ससह मॅग्नस जी मॅक्स ही स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये 30 हून अधिक फीचर्स आणि नवीन 5-इंचाचा डिस्प्ले जोडण्यात आला आहे. यामध्ये क्रूज कंट्रोल, हिल होल्ड, टर्न बाय टर्न नेविगेशन आणि OTA अपडेट्स आहेत. काय आहेत या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत?

तुमच्या फोनवर मिळवा माहिती

मॅग्नस जी मॅक्समध्ये फाईंड माय स्कूटर आणि पिंग माय स्कूटर असे फीचर्स आहेत. यामुळे पार्किंगमध्ये स्कूटर शोधणे अगदी सोपे होणार आहे. मॅग्नस जी मॅक्स ही स्कूटरमध्ये ॲपद्वारे रिअल टाईम चार्जिंग स्टेट्‍स, स्कूटरचे लोकेशन, चार्जिंग हिस्ट्री, आणि बॅटरची माहिती पाहू शकतील. जिओ-फेन्सिंग, चोरीचा अलर्ट आणि टोईंग नोटिफिकेशन्स हे फीचर्सही या स्कूटरमध्ये मिळतात.
OTA हे नवीन सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म अपडेट्सची सुविधा देतो.

बॅटरी लाईफविषयी मोठी अपडेट

या ईव्हीतील बॅटरची लाईफ 2,00,000 पर्यंत आहे. बॅटरी पॅक BLDC हब माऊंटेड इलेक्ट्रिक मोटरला जोडलेला आहे. त्याला 2.4 kw ची पीक पॉवर आणि 130 NM व्हील टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या दाव्यानुसार, या ईव्हीला 142 किमीची रेंज आणि 100 किमीपेक्षा जास्त रेंज देते. ही स्कूटर ताशी 65 किमीचा टॉप स्पीड देते. स्कूटर 5 वर्षे आणि 75,000 किमीच्या वॉरंटीसह येते. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 1,02,999 रुपये इतकी आहे.

30 रुपयांत 142 किलोमीटरचा गाठेल पल्ला

ही ईव्ही ड्युअल टोन रंगात उपलब्ध आहे. सध्या मान्सून ब्लू आणि मॅचा ग्रीनमध्ये ही स्कूटर उपलब्ध आहे. आता सिनामन कॉपर या रंगात ती न्हाऊन निघाली आहे. यात 3kwh क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. ती चार्ज करण्यासाठी अंदाजे 3 ते 3.5 युनिट्स लागतील. विद्युत दर प्रति युनिट 8 रुपये जरी गृहीत धरला तरी चार्जिंगसाठी 30 रुपयांपर्यंत खर्च येईल. यामुळे 30 रुपयांमध्ये ही स्कूटर 142 किलोमीटर दामटता येणार आहे. हा फायद्याचा सौदा ठरू शकतो.

या सुविधेमुळे ग्राहक खूश

या ईव्हीमध्ये क्रुझ कंट्रोल आणि हिल होल्ड असिस्ट या सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. हिल होल्ड असिस्टमुळे चढण आल्यावर स्कूटर मागे मागे येण्यापासून रोखल्या जाईल. अशा परिस्थिती स्कूटर चालकाला मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांना स्कूटर पुढे ढकलणे सोपे जाईल. फाईंड माय स्कूटर या खास फीचरमुळे तुमच्या फोनवरील ॲपद्वारे स्कूटर कुठे आहे, तिचे लोकेशन, स्थान शोधणे सोपे होईल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in