• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2700 कोटींचा मालक, पण मुलगा करतोय 4500 रुपयांची नोकरी, कोण आहे तो?

April 18, 2026 by admin Leave a Comment


Akshay Kumar : बॉलिवूडमधील ‘अ‍ॅक्शन स्टार’ म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार सध्या त्याच्या भूत बंगला या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 17 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत असतानाच अक्षय कुमारने एका मुलाखतीत आपल्या करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्याबाबतही खुलासा केला आहे. विशेष म्हणजे, त्याने आपला मुलगा आरव कुमार याच्याबद्दल सांगितलेल्या गोष्टींनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अक्षय कुमारने सांगितलं की, आरव लहानपणापासूनच स्वावलंबी राहण्याचा प्रयत्न करत आहे. तो सुमारे 15 वर्षांचा असताना घरापासून दूर राहू लागला. ग्लॅमरच्या जगापासून दूर राहून साधं आयुष्य जगण्याचा त्याचा कल आहे.

4500 रुपयांची नोकरी

एका पॉडकास्टमध्ये शुभांकर मिश्रा यांच्यासोबतच्या संभाषणात अक्षय कुमारने सांगितलं की, आरव सध्या नोकरी करत असून त्याचा सुरुवातीचा पगार केवळ 4500 रुपये आहे. मात्र, या गोष्टीचा त्याला अभिमान वाटतो. अक्षय म्हणाला, तो अजूनही 4500 रुपयांवर काम करतो, पण हे खूप चांगलं आहे. मेहनतीची किंमत त्याला कळतेय.

अक्षय कुमारने स्पष्ट केलं की, आरवला चित्रपटसृष्टीत येण्याची अजिबात इच्छा नाही. तो लाईमलाईटपासून दूर राहून स्वतःचा मार्ग निवडत आहे. तो सध्या ग्रामीण भागात जाऊन फॅशन आणि कपड्यांच्या डिझाईनविषयी शिकत आहे. विविध प्रकारचे प्रिंट्स, कापडं आणि त्यामागचं कौशल्य समजून घेण्याचा तो प्रयत्न करत आहे.

वडिलांसारखे गुण

अक्षय कुमारच्या मते, आरव आणि ते स्वतः बऱ्याच बाबतीत सारखे आहेत. दोघांनाही फिटनेसची आवड आहे आणि कामाबद्दलची निष्ठाही सारखीच आहे. तो माझ्यासारखाच उंच आहे आणि कामाबद्दल खूप समर्पित आहे असंही त्याने सांगितलं.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना दोन मुलं आहेत. आरवचा जन्म 2002 मध्ये झाला, तर मुलगी नितारा 2012 मध्ये जन्माला आली. वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं तर अक्षय कुमार सध्या प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखालील ‘भूत बंगला’ या चित्रपटात झळकत आहेत. या चित्रपटात परेश रावल, वामिका गब्बी, तब्बू, राजपाल यादव आणि असरानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय, अक्षय कुमारच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये वेलकम टू द जंगल, हैवान आणि गोलमाल 5 यांचा समावेश आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CSK vs SRH: अभिषेक शर्माने 15 चेंडूत ठोकलं अर्धशतक, अशी कामगिरी करत हैदराबादसाठी नोंदवला विक्रम
  • Weather update : उद्या घराच्या बाहेर पडणं टाळा, राज्यावर मोठं संकट, IMD कडून अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट
  • भारतासाठी अत्यंत मोठी खुशखबर, होर्मुझनंतर इराणचा आणखी मोठा निर्णय, आता एअरस्पेस…
  • एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत? ‘या’ 5 धोक्यांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा होईल मोठे आर्थिक नुकसान
  • RCB vs DC: पराभवानंतर काय चुकलं रजत पाटीदारने सांगितलं, तर केएल राहुलने अक्षरची बाजू मांडली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in