• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

248 कोटींचा मालक असलेल्या अभिनेत्याने घेतली बागेश्वर बाबांची भेट; जमिनीवर बसून केली चर्चा

June 24, 2026 by admin Leave a Comment


करिअरमध्ये एका उंचीवर पोहोचल्यानंतरही अनेक सेलिब्रिटी अध्यात्म आणि समाजकार्याशी जोडून असतात. मानसिक शांती आणि समाधानासाठी ते विविध अध्यात्मिक गुरुंच्याही शरणी जातात. असाच एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता नुकताच बागेश्वर बाबा यांच्या दरबारात पोहोचला. या दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सनातन मठात या अभिनेत्याने बागेश्वर बाबा यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. या भेटीदरम्यान दोघांमध्ये समाजकल्याणाशी संबंधित विविध विषयांवरदेखील चर्चा झाली. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून टायगर श्रॉफ आहे.

या भेटीदरम्यान टायगरला बागेश्वर बाबांच्या विविध सार्वजनिक सेवा उपक्रमांची माहिती देण्यात आली. यामध्ये गरीब मुलींसाठीचं कर्करोग रुग्णालय आणि बागेश्वर धाम इथं सुरू असलेल्या ‘माँ अन्नपूर्णा प्रसादम’चाही समावेश होता. टायगर श्रॉफने या सार्वजनिक कल्याणकारी उपक्रमांची प्रशंसा केली. या भेटीच्या शेवटी टायगरने बागेश्वर बाबांना शाल अर्पण केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. बागेश्वर धाम सरकार या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर या भेटीचे फोटो पोस्ट करण्यात आले.

भेटीचे फोटो-

मुंबई स्थित सनातन मठ में पूज्य सरकार से बॉलीवुड के प्रसिद्ध अभिनेता टाइगर श्रॉफ ने सादर भेंट कर आशीर्वाद प्राप्त किया। इस आत्मीय मुलाकात के दौरान दोनों के बीच समाजहित एवं जनकल्याण से जुड़े विभिन्न विषयों पर विस्तार से चर्चा हुई। बातचीत के दौरान पूज्य सरकार द्वारा संचालित जनसेवा… pic.twitter.com/iRHKTBpGaq

— Bageshwar Dham Sarkar (Official) (@bageshwardham) June 23, 2026

या पोस्टमध्ये लिहिलं, ‘टायगर श्रॉफने मुंबईतील सनातन मठात जाऊन बागेश्वर बाबांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीदरम्यान दोघांनीही समाजकल्याण आणि जनहिताशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी टायगरला गुरू महाराजांच्या नेतृत्वाखालील विविध जनसेवा उपक्रमांची माहिती देण्यात आली. टायगरने या जनहितार्थ राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची प्रशंसा केली.’

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे बागेश्वर बाबा म्हणून ओळखले जातात. ते मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम या हनुमान मंदिराचे पीठाधीश आणि प्रसिद्ध कथावाचक आहेत. बागेश्वर धाम इथं ते हनुमानजींची भक्ती आणि रामकथा किंवा भागवत कथेचं वाचन करतात. तर दुसरीकडे टायगर श्रॉफ हा प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आहे. 248 कोटी रुपयांची संपत्ती असलेला टायगर लवकरच ‘हिटमॅन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत असतील. टायगर त्याच्या फिटनेस, डान्स आणि स्टंट्ससाठी ओळखला जातो.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डोळ्यातून अश्रूच्या धारा, कोणी जोडले हात, कुणाचा संताप, आदिवासी विद्यार्थ्याची प्रकृती खालावली, सरकार हस्तक्षेप करणार?
  • CID बंद होण्यामागे अंतर्गत राजकारण? दयाचा धक्कादायक दावा; लता मंगेशकरांनी निर्मात्यांना घेतलं होतं फैलावर
  • Kangana Sharma : कास्टिंगच्या नावाखाली नको ती मागणी, अभिनेत्रीला आला हादरवणारा अनुभव
  • खूपच गोड दिसतेय.., पिवळ्या साडीमधील ही अप्सरा कोण? सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड
  • भारताने 500 धावांचा पल्ला कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा गाठला आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in