• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

18 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू, कार चालवणाऱ्याला खरचटलेही नाही

July 22, 2026 by admin Leave a Comment


हॉलिवूडमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ‘गॉडझिला वर्सेस काँग’ आणि ‘गॉडझिला एक्स काँग: द न्यू एम्पायर’ या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. या सिनेमात जिया ही भूमिका साकारणारी 18 वर्षीय अभिनेत्री केली हॉटलचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

अभिनेत्री केली हॉटलचा अपघात मंगळवारी पहाटे अमेरिकेच्या मेरिलँडमधील इजॅम्सविल (Ijamsville) येथे झाला. तिच्या निधनाची बातमी समोर येताच चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. फ्रेडरिक काउंटी शेरिफ कार्यालयाच्या माहितीनुसार, अपघात सकाळी सुमारे ३ वाजता घडला. १९९५ सालच्या मॉडेलची होंडा अकॉर्ड कार रस्त्यावरून उतरून एका पुलावर जाऊन धडकली. या कारमध्ये एकूण तीन जण होते.

कारमध्ये इतर दोघेही

माहितीनुसार, केली हॉटल कारमध्ये दोन इतर प्रवाशांसोबत होती. कार अचानक रस्त्यावरून खाली उतरून पुलाला धडकली. अधिकाऱ्यांचा सांगितले की, कारचा वेग या दुर्घटनेचे मुख्य कारण होते. अपघात झाल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच केली यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपयश आले. कार चालवणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला किरकोळ इजा झाली आहे.

वडिलांचे भावनिक विधान

केली यांचे वडील जोशुआ हॉटल (Joshua Hottle), जे स्वतः बहिरे आहेत, यांनी फेसबुक लाईव्हद्वारे अमेरिकन साइन लँग्वेजमध्ये आपल्या मुलीच्या निधनाची दुःखद बातमी सांगितली. त्यांनी म्हटले, “आम्ही तिच्यासोबत घालवलेले 18 वर्ष कधीही विसरणार नाही, काश आम्हाला तिच्यासोबत आणखी वेळ मिळाला असता.” त्यांनी सांगितले की ते टेक्सासहून मेरिलँडला आपल्या मुलीचे पार्थिव घेण्यासाठी येत आहेत. सर्वात भावनिक बाब ही होती की, मुलीला गमावूनही जोशुआ हॉटल यांनी अपघाताच्या वेळी कार चालवणाऱ्या 19 वर्षीय युवकाला माफ केले. त्यांनी म्हटले, “मी तुला माफ करतो. या घटनेमुळे तुझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नकोस.” दरम्यान, केली यांच्या आईनेही सांगितले की त्यांना अजूनही असे वाटते की त्यांची मुलगी त्यांच्यासोबतच आहे.

हॉलीवूड कलाकारांनी व्यक्त केला शोक

केली हॉटलच्या निधनावर हॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केले आहे. तिचा सहकलाकार मिली बॉबी ब्राउन यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले, “ही बातमी ऐकून मी पूर्णपणे खचून गेले आहे. तुझी खूप आठवण येईल.” ऑस्कर विजेती अभिनेत्री मार्ली मॅटलिन यांनी त्यांना प्रतिभावान आणि सुंदर कलाकार म्हणून श्रद्धांजली वाहिली. तसेच, ऑस्कर विजेते अभिनेते ट्रॉय कोत्सुर (Troy Kotsur) यांनी म्हटले की केली यांचा मृत्यू त्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलीची आठवण करून देतो आणि जीवनातील प्रत्येक क्षणाची कदर करायला शिकवतो.

केली हॉटल कोण होती?

टेक्सास स्कूल फॉर द डेफची विद्यार्थिनी केली यांनी केवळ ९ वर्षांच्या वयात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. ‘गॉडझिला’ चित्रपटांमध्ये तिने ‘जिया’ ही भूमिका साकारली होती, जी विशाल ‘काँग’शी साइन लँग्वेजद्वारे भावनिक संबंध जोडते. २०२४ च्या चित्रपटासाठी त्यांना ‘सॅटर्न अवॉर्ड्स’मध्ये सर्वोत्कृष्ट युवा कलाकार श्रेणीत नामांकनही मिळाले होते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • खराब कोलेस्ट्रॉल वाढलंय? स्वयंपाकघरातील ‘हा’ मसाला ठरू शकतो फायदेशीर; तज्ञांनी सांगितली वापरण्याची योग्य पद्धत
  • मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या…
  • थलपती विजय यांच्या पत्नीने घटस्फोट मागे घेतल्यानंतर आईबद्दल मुलगा म्हणाला, ती 24 तास फक्त..
  • Rupali Chakankar : बाई एवढी माया आली कुठून, 35 कोटी रुपये..रुपाली चाकणकर यांच्या नव्या The Nines हॉटेलवर काँग्रेस नेत्याचा सवाल
  • Donald Trump: ट्रम्पची मोठी कारवाई, चार भारतीय कंपन्यांना एका झटक्यात दणका, अचानक असं का केलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in