• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

16 वर्षांचा विद्यार्थी, 38 वर्षांची ट्यूशन टीचर; तासन्तास फोनवर बोलणं अन् एक दिवस अचानक…

August 21, 2026 by admin Leave a Comment


आपला मुलगा जिच्याकडे ट्यूशनसाठी जात होता, तिच्यासोबतच तो गायब झाल्याने घरच्यांचा तोंडचं पाणी पळालं. 16 वर्षांचा विद्यार्थी आणि 38 वर्षांची शिक्षिका एकत्र गायब झाल्याने मोठी खळबळ माजली. हे प्रकरण समोर येताच पोलीसही चक्रावले, अनेक दिवस शोध सुरू होता. 4 ऑगस्टला घरातून बाहेर पडलेला मुलगा रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने घरचे धास्तावले. मात्र तो जिच्याकडे ट्यूशनला जातो, ती महिला देखील गायब असल्याचे समजताच गोंधळ आणखी वाढला. एका अल्पवयीन विद्यार्थी आणि त्याच्यापेक्षा 22 वर्षांनी मोठी अशलेली शिक्षिका एकत्र गाब असल्याचे समोर येताच प्रचंड खळबळ माजली.

मुलगा परत न आल्याने काळजीत पडलेल्या कुटुंबियांनी अखेर पोलिसांत धाव घेतली, तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. तो विद्यार्थी आणि त्याची ट्यूशन टीचर या दोघांमध्येही बराच काळ बोलणं व्हायतं असं मोबाईल कॉल डिटेल्समधून स्पष्ट झालं. रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना महत्वाचा धागा मिळाला आणि त्यांचा शोध घेतला. दोघेही आग्रा कॅंट स्टेशनवर ट्रेनमध्ये बसताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांचा शोध सुरू केला आणि अखेर त्या 16 वर्षांच्या विद्यार्थ्याला नोएडामधून तर शिक्षिकेला मथुरा येथून ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांना सुरक्षितपणे शोधून काढल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलं. मात्र कुटुंबीयांनी सध्या कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिला आहे.

शाळेच्या प्रोजेक्टचं नाव सांगून घराबाहेर पडला आणि..

हे प्रकरण आग्रा येथील ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. 16 वर्षीय विद्यार्थी हा शहरातील एका पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता 11वीत शिकतो. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अभ्यासावरून त्याला घरी रागावण्यात आलं होतं. त्यामुळे तो काहीसा नाराज आणि त्रस्त होता. तो विद्यार्थी धांधूपुरा परिसरातील 38 वर्षीय शिक्षिकेकडे ट्युशनला जायचा. शाळेच्या प्रोजेक्टचे काम आहे असं सांगून 4 ऑगस्ट रोजी तो घरातून बाहेर पडला. त्याच्याकडे सुमारे तीन हजार रुपये होते. त्याने आपली सायकल एका मित्राच्या घरी ठेवली आणि त्यानंतर तो निघून गेला. बराच वेळ उलटूनही तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा मित्र, नातेवाईक आणि परिचितांकडे शोध घेतला, मात्र त्याचा काहीच पत्ता लागला नाही.

शिक्षिकाही त्याच वेळी बेपत्ता

त्या विद्यार्थ्याचा शोध घेत असताना कुटुंबीयांना आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली. त्याला ट्युशन शिकवणारी शिक्षिकाही आपल्या घरातून बेपत्ता झाल्याचं समोर आलं. ही शिक्षिका विवाहित तिला दोन मुलंही आहेत. गायब झालेल्या विद्यार्थ्याचं वय 16 वर्षं, तर शिक्षिकेचे वय सुमारे 38 वर्षे आहे.दोघेही एकाच काळात घरातून बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.

विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी ताजगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अल्पवयीन विद्यार्थी बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दुसरीकडे, शिक्षिकेच्या पतीनेही त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.

मोबाईलने उलगडलं सत्य

तपासादरम्यान त्या दोघांच्या मोबाईल क्रमांकांची कॉल डिटेल्स तपासण्यात आले. त्या दोघांमध्ये बराच काळ फोनवर बोलणं होत असल्याची माहिती समोर आली. यावरून पोलिसांना विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्यात सातत्याने संपर्क असल्याचा संशय आला. तसेच, दोघे एकत्र घरातून निघून जाण्यामागे काही संबंध असण्याची शक्यता पोलिसांना वाटली. यानंतर दोघे जिथून गेले असतील, त्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात करण्यात आली. त्याचदरम्यान आग्रा कॅन्ट रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. त्यामध्ये दोघेही ट्रेनमध्ये चढताना दिसून आले. या फुटेजमुळे तपासाची दिशा बदलली आणि रेल्वे मार्गाच्या आधारे पोलिसांनी त्यांचा शोध अधिक वेगाने सुरू केला. अखेर बराच शोध घेऊन त्या विद्यार्थ्याला नोएडा येथून ताब्यात घेण्यात आलं, तर शिक्षिकाही नंतर सापडली.

चौकशीदरम्यान शिक्षिकेनं सांगितलं कारण

पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्या शिक्षिकेने विद्यार्थ्याने घर सोडण्याचं कारण सांगितलं. त्याला घरातून अभ्यासावरून सारखा ओरडा पडायचा, त्यामुळे तो विद्यार्थी त्रासला होता, अनेकदा तो माझ्यासमोर रडायचा. 4 ऑगस्ट रोजी त्याने मला फोन केला आणि आत्महत्येची धमकी दिली, त्याचं बोलणं ऐकून मी घाबरले आणि त्याने वाकडतिकडं काही करून नये म्हणून मी त्याच्यासोबत गेले, असं तिने बचावार्थ सांगितलं. मात्र, त्यानंतर परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेली. आपला निर्णय चुकीचा असल्याची मला जाणीव झाली, पण घरी परतण्याचं धाडस होत नव्हतं, असंही त्या शिक्षिकेने सांगितलं. पोलिसांनी चौकशीदरम्यान दोघांचेही जबाब नोंदवले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in