• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

1..2..3..ते 18! पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलिया बांग्लादेश कसोटी सामन्यात धडाधड विकेट, 51 वर्षात तिसऱ्यांदा असं घडलं

August 22, 2026 by admin Leave a Comment

AUS vs BAN 2nd Test, DAY-1: ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवून 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची करो या मरोची स्थिती आहे. कारण हा सामना ड्रॉ किंवा बांगलादेशने जिंकला मालिका गमवण्याची नामुष्की ओढावणार आहे. असं असताना दुसर्‍या कसोटी सामन्यात गोलंदाजांचा कहर दिसला. पहिल्याच दिवशी धडाधड 18 विकेट पडल्या. प्रथम फलंदाजीसाठी आलेला बांगलादेशचा संघ अवघ्या 64 धावांवर बाद झाला. त्यानंतर बांगलादेशी गोलंदाजांनीही ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तसंच प्रत्युत्तर दिलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 8 गडी गमवून 165 धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा आक्रमक बाणा

नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मग काय पहिल्या चेंडूपासून बांगलादेशवर दबाव वाढवला. शदमान इस्लाम पहिल्याच चेंडूवर चालता झाला. मिचेल स्टार्कने या डावात वर्चस्व गाजवलं. त्याने 10 षटकात 6 निर्धाव षटकं टाकत 12 धावा देत 6 गडी तंबूत पाठवले. तर पॅट कमिन्सने 3 आणि जोश हेझलवूडच्या खात्यात 1 विकेट आली. यासह बांगलादेशचा डाव अवघ्या 64 धावांवर आटोपला. बांगलादेशच्या चार फलंदाजांना खातंही खोलता आलं नाही. तर तीन फलंदाज एकेरी धावसंख्येवर तंबूत परतले. फलंदाजांमध्ये शोरिफुल इस्लामने सर्वाधिक 14 धावांची खेळी केली.

बांगलादेशच्या शरीफुल इस्लामची भेदक गोलंदाजी

बांगलादेशचा संघ 64 धावांवर बाद झाल्यानंतर बांगलादेशी गोलंदाजांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. शरीफुल इस्लामने ऑस्ट्रेलिया फलंदाजांना दणका दिला. अवघ्या 11 षटकात 35 धावा देत 6 गडी बाद केले. ट्रेव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांना तंबूचा रस्ता दाखवला. तर तस्कीन अहमद मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी एक विकेट काढली. त्यामुळे पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे 165 धावांवर 8 विकेट तंबूत होते.

51 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

मॅके कसोटीच्या पहिल्या दिवशी एकूण 74 षटकांचा खेळ पार पडला. दोन्ही संघांनी मिळून 229 धावा केल्या आणि 18 विकेट पडल्या. ऑस्ट्रेलियन भूमीवर मागच्या 51 वर्षात कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी धडाधड इतक्या विकेट पडण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी फक्त दोनदा एकाच दिवशी 18हून अधिक विकेट पडल्याचा प्रकार घडला होता.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in