• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

1 सप्टेंबर आधी करा बुकींग! Tata Nexon, Punch आणि Harrier सह या कारची किंमत वाढणार, 25,000 रु. पर्यंतची दरवाढ

August 21, 2026 by admin Leave a Comment


जर तुम्ही देखील नवीन कार खरेदी करण्याचा विचार करण्याचा विचार करत असाल तर फेस्टीव्ह सिझनची वाट पाहात असाल तर तुम्हाला झटका लागू सकतो.फेस्टीव्ह सिझनच्या आधी भारताची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स कस्टमर्सला मोठा झटका देऊ सकतो. जर तुम्हाला टाटाची कोणती नवी कार वा SUV खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर तुम्हा जुन्या किंमती कार बुक करण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. कारण पुढच्या महिन्याच्या १ सप्टेंबरपासून कंपनी आपल्या कारच्या किंमती वाढवू शकतात.ज्यामुळे तुमची आवडती कार महाग मिळू शकते.

रॉयटर्सच्या बातमीनुसार टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेडने तिच्या पॅसेंजर कारच्या संपूर्ण पोर्टफोलियोच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून कंपनीच्या कार आणि सुव्ह २५,००० हजारपर्यंत महागणार आहेत. ही वाढ पेट्रोल-डिझेल आणि इलेक्ट्रीक वाहन म्हणजे EV, दोन्ही सेगमेंटवर लागू होणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की प्रोडक्शन खर्चात होत असलेली वाढ आणि महागाई यामुळे दर वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

किंमतीत मॉडेलनुसार बदल

कोणत्या कारच्या किंमतीत किती वाढ होणार हे मॉडेल आणि व्हेरिएंट निश्चित करणार आहे. कंपनीच्यानुसार हा बदल याप्रकारे निश्चित केला आहे की खरेदीदारांसाठी कारची व्हॅल्यू कायम राहिल. कार प्रोडक्शनच्या खर्चाचा मोठा हिस्सा स्वत: कंपनी सहन करत आहे आणि केवळ काही हिस्सा ग्राहकांवर टाकला जात आहे असे टाटा मोटर्सने स्पष्ट केले आहे.

या वर्षीची तिसरी मोठी वाढ

साल २०२६ मध्ये टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेईकल बिझनस द्वारा केलेली ही तिसरी मोठी दरवाढ आहे.याआधी कंपनीने १ एप्रिलपासून ICE वाहनांची किंमतीत सरासरी ०.५ टक्के वाढ केली होती. त्यानंतर १ जुलैपासून ICE आणि EV पोर्टफोलियोच्या किंमतीत १.५ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती.

संपूर्ण ऑटो सेक्टरवर परिणाम

टाटाच नव्हे तर मारुती सुझुकी कंपनीने जुलैमध्ये घोषणा केली होती की ती ऑगस्टपासून कारच्या किंमतीत ३० हजारापर्यंत दरवाढ करणार आहे. तर हुंडई मोटर इंडियाने देखील १ सप्टेंबरपासून वाढीचे संकेत दिले आहे.

कार तयार करणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे की महागाई, कच्च्या मालाचे वाढते दर, आणि वाढता ऑपरेटिंग कॉस्टमुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. यासोबतच इराण युद्धामुळे जागतिक व्यापार आणि ऊर्जा बाजारातील व्यत्ययामुळेही ऑटो इंडस्ट्रीवरील खर्चात वाढ होत आहे.
नवीन दरवाढ टाटाच्या सर्व पॅसेंजर कारवर लागू होणार आहे. यात Tiago, Altroz, Tigor, Punch, Nexon, Curvv, Sierra, Harrier आणि Safari कारचा समावेश आहे. यासोबतच Tiago, Tigor, Punch, Nexon, Curvv, Sierra आणि Harrier चे इलेक्ट्रीक मॉडेल देखील महाग होणार आहेत.

कंपनीने अजून व्हेरिएंटच्या नुसार नवीन दराची संपूर्ण यादी जाहीर केलेली नाही. परंतू जे १ सप्टेंबरच्या आधी बुकींग करतील त्यांना डीलरशिपचे धोरण आणि बुकींगच्या तारखे आधारे जुन्या दरांचा फायदा मिळू शकतो.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in