• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

१५ वर्षांच्या वैभव सुर्यवंशी याची कोट्यवधीची कमाई, द्यावा लागणार इन्कम टॅक्स ? आयकर विभागाचा नियम काय ?

June 7, 2026 by admin Leave a Comment

आयपीएलमध्ये धमाकेदार बल्लेबाजी करुन सर्वांची वाहवा मिळवणारा अवघ्या १५ वर्षांचा वैभव सुर्यवंशी हा भारतीय क्रिकेटचा नवा स्टार बनला आहे. कमी वयातच वैभव सुर्यवंशी याने कोट्यवधींची कमाई केली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की अल्पवयीन असल्याने त्याला इन्कम टॅक्समधून सुट मिळणार का ? का त्याला आयकर भरावा लागणार आहे. आयकर कायद्या अशा प्रकरणात विशेष नियम तयार करण्यात आले आहेत. कोणते ही नियम ते पाहूयात..

सर्वसाधारणपणे आयकर कायद्यांतर्गत कोणत्याही अल्पवयीन मुलाच्या उत्पन्नाला त्यांच्या पालकाच्या उत्पन्नाला जोडले जाते. यास क्लबिंग ऑफ इन्कम म्हटले जाते. यानंतर त्या उत्पन्नावर आई-वडीलांच्या टॅक्स स्लॅबनुसार कर लावला जातो. मात्र, या नियमात काही महत्वाचे अपवाद आहे. जर एखादा अल्पवयीन विशेष प्रतिभा, कौशल आणि मेहनतीआधारे कमाई करत असेल, तर त्याचे उत्पन्न हे आई-वडीलांच्या उत्पन्नात जमेस धरले जात नाही. यात खेळ, अभिनय, गायन, कला आणि अन्य क्षेत्रातील प्रतिभेने होणाऱ्या उत्पन्नाचा समावेश केला जातो.

वैभव सूर्यवंशी याला कोणता नियम?

वैभव सूर्यवंशी याची कमाई क्रिकेट आणि त्यांची कामगिरीमुळे आहे. त्यामुळे आयकर नियमांनुसार यात त्याच्या उत्पन्नाला स्वतंत्र उत्पन्न मानले जाणार. म्हणजे त्यांची कमाई क्लबिंग ऑफ इन्कम च्या नियमात येत नाही. मात्र, याचा अर्थ असा नाही की त्याची कमाई संपूर्णपणे करमुक्त असेल. जर त्यांचे एकूण उत्पन्न आयकर विभागाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. तर त्यावर नियमानुसार टॅक्स द्यावा लागणार आहे. मात्र, वैभव अल्पवयीन आहे, त्यामुळे त्याच्या नावाने आयकर रिटर्न (ITR) त्याचे आई-वडील वा कायदेशीर पालकांद्वारा दाखल केले जाईल. रिटर्नमध्ये त्यांच्या क्रिकेटमधून झालेली जास्त कमाई, ब्रँड एंडोर्समेंट, पुरस्कार रक्कम वा अन्य उत्पन्नाचे विवरण दिले जाईल.

आयपीएलने मिळाली नवी ओळख

वैभव सूर्यवंशी यांनी दोन आयपीएल सिझनमध्ये शानदार खेळ करत क्रिकेट जगताचे लक्ष त्याच्याकडे खेचले आहे. त्यांच्या खेळाने प्रभावित होऊन निवड समितीने त्यांना भारतीय टीममध्ये संधी दिली आहे. मुख्य निवड समितीचे अध्यक्ष (Chief Selector) अजित आगरकर यांनी देखील वैभव याने त्याच्या खेळाच्या जोरावर निवड समितीला त्याला निवडण्यासाठी मजबूर केल्याचे म्हटले आहे. वैभव सुर्यवंशी कमी वयात मिळालेल्या या यशाने भारतीय क्रिकेटचा उदयोन्मुख तारा बनला आहे.

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in