• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

होर्मुज खाडीत हाहाकार! अमेरिकेकडून मोठी कारवाई, जगात खळबळ, भारतीय..

April 20, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्धातील शांतता बैठक इस्लामाबाद येथे होणार होती. मात्र, आता परिस्थिती चिघळली आहे. स्थिती भयंकर झाली. होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनले. यादरम्यानच अमेरिकेने धक्कादायक पाऊल उचलले. इराणकडून मोठा इशारा देत आम्ही जोरदार प्रतिउत्तर देऊ असे म्हटले. होर्मुज खाडी जवळ इराणचे जहाज अमेरिकेने ताब्यात घेतले. हे जहाज अमेरिकेची नाकेबंदी तोडत असल्याचा आरोप अमेरिकेने केला. इराणच्या जहाजावर अमेरिकेने कब्जा केल्याने परिस्थिती चिघळली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आम्ही ओमान खाडीत इराणच्या जहाजाला टार्गेट करत त्याला ताब्यात घेतले. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, हे जहाज होर्मुज खाडीतील नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करत होते. अमेरिकेने जहाज ताब्यात घेतल्यानंतर इराणही आक्रमक भूमिकेत आहे.

अमेरिकेकडून सांगण्यात आले की, या जहाजाला आम्ही परत जाण्याच्या सूचना दिल्या होता. पण ते थांबत नव्हते. त्यानंतर आम्ही हल्ला केला आणि त्याला ताब्यात घेतले. या इराणी जहाजाचे नाव तूस्का आहे. सध्याच्या परिस्थितीत हे इराणी जहाज अमेरिकेच्या ताब्यात आहे. जहाज अमेरिकेने ताब्यात घेतल्यानंतर इराणकडून याला जोरदार उत्तर दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

इराणी टीव्ही ISNA ने इराणी मिलिट्री कमांड सेंटर खातम अल अंबिया यांच्या मते लवकरात लवकर अमेरिकेला उत्तर दिले जाईल. इराणच्या प्रवक्तांनी म्हटले की, आम्ही अमेरिकेच्या या करवाईला खूप लवकर उत्तर देऊ. आता होर्मुज खाडी जवळ काहीतरी खतरनाक करण्याच्या तयारीत इराण असल्याचे बघायला मिळत आहे. युद्धविराम बैठक होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसल होती.

मात्र, गेल्या 48 तासात संपूर्ण परिस्थिती बदलून गेल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेने इराणजवळ केलेल्या नाकेबंदीमुळे स्थिती अधिक चिघळत आहे. हेच नाही तर होर्मुज खाडी खुली ठेवण्याचा दावा करणाऱ्या इराणकडून आता पूर्णपणे होर्मुज खाडी बंद करण्यात आली. इराणकडून पूर्णपणे होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्ण होर्मुज खाडी ठप्प झाल्याचे बघायला मिळत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Oil Price Surge : आंतरराष्ट्रीय बाजारात मोठा भूकंप, जगात हाहाकार, युद्धात मोठा फटका, थेट तेलाच्या..
  • Amravati Shocker : त्या फ्लॅटवर जे झालं… परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचा हादरवणारा दावा !
  • ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम नंदिताने उत्तराखंडच्या ‘या’ प्रसिद्ध मंदिरात पुन्हा केलं लग्न
  • Rafale Jet : अमेरिका, रशियापेक्षा फ्रान्सच्या राफेल विमानावर फक्त भारताचाच नाही तर जगातल्या अनेक देशांचा इतका विश्वास का?
  • मध्य रेल्वेचा खोळंबा, डोंबिवलीत लोकल रुळावरून घसरली; वेळापत्रकाचे तीन तेरा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in