• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हॉस्टेलच्या मुलींसाठी राजकारणी लावतात बोली; त्या व्हिडीओने मोठी खळबळ, नेत्याने सगळंच बाहेर काढलं!

April 23, 2026 by admin Leave a Comment


बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील अपक्ष खासदार आणि काँग्रेस नेते पप्पू यादव यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. पाटण्यातील वसतिगृहातील मुली अधिकाऱ्यांना पुरवल्या जातात, असे पप्पू यादव यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर नेते मुलींची बोली लावत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. बुधवारी पूर्णिया जिल्ह्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत पप्पू यादव यांनी त्यांच्या मोबाईलवर काही व्हिडीओ क्लिप दाखवत हे खळबळजनक दावे केले आहेत.

मोबाईलवर एक व्हिडीओ क्लिप दाखवत पप्पू यादव म्हणाले वृत्तपत्राच्या लोकांनी गर्ल्स हॉस्टेलमध्ये स्टिंग ऑपरेशन केले. ही एक घटना नसून अशा अनेक घटना आहेत. अशाच प्रकारे अनेक मुली पकडल्या गेल्या. हे संपूर्ण शोषण नेत्यांद्वारे आणि नेत्यांसाठीच सुरू आहे. त्यानंतर दुसरी क्लिप दाखवताना ते म्हणाले पाटणा आणि मोठ्या शहरांमध्ये अधिकाऱ्यांना मुली पुरवल्या गेल्या. मी जे काही बोलतो ते पुराव्याशिवाय नसते. कायद्यानुसार तुम्ही हे स्टिंग ऑपरेशन केले आहे.

मोबाईलवर एक व्हिडीओ क्लिप दाखवत पप्पू यादव म्हणाले, “वृत्तपत्राच्या लोकांनी गर्ल्स हॉस्टेलमध्ये स्टिंग ऑपरेशन केले. ही एक घटना नसून अशा अनेक घटना आहेत. अशाच प्रकारे अनेक मुली पकडल्या गेल्या. हे संपूर्ण शोषण नेत्यांद्वारे आणि नेत्यांसाठीच सुरू आहे.” त्यानंतर दुसरी क्लिप दाखवताना ते म्हणाले, “पाटणा आणि मोठ्या शहरांमध्ये अधिकाऱ्यांना मुली पुरवल्या गेल्या. मी जे काही बोलतो ते पुराव्याशिवाय नसते. कायद्यानुसार तुम्ही हे स्टिंग ऑपरेशन केले आहे.

या पत्रकार परिषदेत खासदार पप्पू यादव म्हणाले की महिलांचे सतत शोषण होत आहे. अलीकडे अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत महिला आणि मुलींच्या छळावर आवाज उठवणे चुकीचे आहे का? ते पुढे म्हणाले मुली आणि महिलांच्या शोषणाविरोधात कोणीतरी तर आवाज बुलंद करेलच. मी सुद्धा आईचे दूध पिऊन मोठा झालो आहे त्याचे कर्ज फेडावे लागेल. समाजात मुलींवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आपण सतत आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत खासदार पप्पू यादव म्हणाले की, महिलांचे सतत शोषण होत आहे. अलीकडे अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत महिला आणि मुलींच्या छळावर आवाज उठवणे चुकीचे आहे का? ते पुढे म्हणाले, “मुली आणि महिलांच्या शोषणाविरोधात कोणीतरी तर आवाज बुलंद करेलच. मी सुद्धा आईचे दूध पिऊन मोठा झालो आहे, त्याचे कर्ज फेडावे लागेल.” समाजात मुलींवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आपण सतत आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले.

पप्पू यादव यांनी विविध क्षेत्रातील महिलांच्या छळाचा उल्लेख करत अनेक नेत्यांकडून मुलींची बोली लावली जात असल्याचा आरोप केला. या घटनांवर महिला आयोगाची नजर नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपण कोणाचेही वैयक्तिक नाव घेतलेले नाही फक्त महिलांवरील शोषण थांबवण्याबद्दल बोलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पप्पू यादव यांनी विविध क्षेत्रातील महिलांच्या छळाचा उल्लेख करत अनेक नेत्यांकडून मुलींची बोली लावली जात असल्याचा आरोप केला. या घटनांवर महिला आयोगाची नजर नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपण कोणाचेही वैयक्तिक नाव घेतलेले नाही, फक्त महिलांवरील शोषण थांबवण्याबद्दल बोलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नुकतेच पप्पू यादव यांनी दावा केला होता की नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय ९० टक्के महिला राजकारण करू शकत नाहीत. त्यांच्या या विधानावरून मोठा गदारोळ झाला होता. या विधानाची दखल घेत महिला आयोगाने मंगळवारी स्वतःहून दखल घेतली आणि पप्पू यादव यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते. मात्र बुधवारीच पप्पू यादव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला आयोगाची नोटीस कचऱ्याच्या डब्यात फेकल्याचे सांगितले. महिला आयोगाच्या अध्यक्षा अप्सरा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

नुकतेच पप्पू यादव यांनी दावा केला होता की, “नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय ९० टक्के महिला राजकारण करू शकत नाहीत.” त्यांच्या या विधानावरून मोठा गदारोळ झाला होता. या विधानाची दखल घेत महिला आयोगाने मंगळवारी स्वतःहून दखल घेतली आणि पप्पू यादव यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, बुधवारीच पप्पू यादव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला आयोगाची नोटीस कचऱ्याच्या डब्यात फेकल्याचे सांगितले. महिला आयोगाच्या अध्यक्षा अप्सरा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

त्या म्हणाल्या की पप्पू यादव यांनी आयोगाची नोटीस कचऱ्याच्या डब्यात टाकून अध्यक्षांवर अशोभनीय टिप्पणी केली. त्यांनी जेडीयूच्या कार्याध्यक्षांसोबत अध्यक्षांचा फोटो शेअर करून अव्यवहार्य भाष्य केले. पप्पू यादव यांच्या या वर्तणुकीची महिला आयोगाने पुन्हा दखल घेतली आहे. नोटिशीमध्ये म्हटले आहे की महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या प्रतिमेला तडा गेला असून याप्रकरणी मानहानीचा खटला दाखल केला जाईल. तसेच पप्पू यादव यांना ३० एप्रिल रोजी पुराव्यांसह हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्या म्हणाल्या की, पप्पू यादव यांनी आयोगाची नोटीस कचऱ्याच्या डब्यात टाकून अध्यक्षांवर अशोभनीय टिप्पणी केली. त्यांनी जेडीयूच्या कार्याध्यक्षांसोबत अध्यक्षांचा फोटो शेअर करून अव्यवहार्य भाष्य केले. पप्पू यादव यांच्या या वर्तणुकीची महिला आयोगाने पुन्हा दखल घेतली आहे. नोटिशीमध्ये म्हटले आहे की, महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या प्रतिमेला तडा गेला असून, याप्रकरणी मानहानीचा खटला दाखल केला जाईल. तसेच, पप्पू यादव यांना ३० एप्रिल रोजी पुराव्यांसह हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भोंदू खरात प्रकरण भोवलं, बड्या पदावरील व्यक्तीचा राजीनामा, नेमका आरोप काय?
  • शिंदेंच्याच पक्षातील नेत्याचा मराठी सक्तीला विरोध, थेट पत्र लिहून केली मोठी मागणी; सरकार मोठा निर्णय घेणार?
  • ‘महाभारत’मधील ती खास भूमिका, 1500 ऑडिशननंतर या अभिनेत्रीची निवड, सध्या जगते असं आयुष्य
  • शुभ मुहूर्त ठरला! इंदोरीकर महाराजांच्या मुलीची लग्नपत्रिका व्हायरल, लग्न कधी? कुठे? प्रमुख पाहुणे कोण कोण?
  • वाईट दिवस आले, दारू तुफान महागणार, या एका गोष्टीच्या कमतरतेमुळे खिसा थेट खाली होणार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in