• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हेमा मालिनी यांचे सावत्र मुलांसोबत वाद! सनी आणि बॉबी देओल यांच्यासोबत असलेल्या नात्यावर आता स्पष्टच बोलल्या

August 22, 2026 by admin Leave a Comment


Hema Malini : अभिनेते धर्मेंद्र यांच्या कुटुंबाबद्दल आज सर्वांना माहिती आहे. त्यांचं कुटुंब फार मोठं असून कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती प्रेमळ आहे. त्यांचं कुटुंब कायम चर्चेत देखील असतं. सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांचं दोन कुटुंब आहेत. धर्मेंद्र यांनी पहिली लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत केलं. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांची चार मुलं आहेत. दोन मुली आणि दोन मुलं. त्यांच्या मुली लाईमलाईटपासून दूर असतात. पण मुलांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल यांना आज कोणत्या ओळखीची गरज नाही. तर धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, धर्मेंद्र विवाहित असताना देखील त्यांनी दुसरं लग्न अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत केलं आणि दोन मुलींचं जगात स्वागत केलं. ईशा देओल आणि आहाना देओल…

असं देखील म्हणतात, धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबियांमध्ये वाद आहे. हेमा मालिनी कधी सनी – बॉबी देओल यांच्या कार्यक्रमांमध्ये दिसल्या नाहीत, तर सनी आणि बॉबी देओल कधी हेमा मालिनी यांच्या कार्यक्रमात दिसल्या नाहीत. असं देखील सांगितलं जातं की, हेमा मालिनी यांच्यासोबत सनी आणि बॉबी देओल यांचे वाद आहेत. धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबियांमध्ये वाद आहेत? असा दावा देखील अनेकांकडून करण्यात आला आहे.

सांगायचं झालं तर, गेल्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. अशात सनी देओल याने वडिलांसाठी शोक सभेचं आयोजन केलं होतं. पण शोक सभेत हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली दिसल्या नाहीत. तर हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी दुसऱ्या शोकसभेचं आयोजन केलं होतं तेथे धर्मेंद्र यांचं पहिलं कुटुंब पोहोचलं नाही. ज्यामुळे दोन्ही कुटुंबियांमध्ये मतभेद आहेत… असं चित्र समोर आलं.

पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी सावत्र मुलांसोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. हेमा मालिनी म्हणाल्या, ‘ज्या चर्चा आमच्या नातेसंबंधांबद्दल रंगल्या आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. आम्ही एकमेकांसोबत आनंदी आहोत. कुटुंब एकत्र आहे…’ असं सांगत हेमा मालिनी म्हणाल्या, ‘AI च्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या सगळ्याच गोष्टींवर विश्वास ठेऊ नका…’, सध्या सर्वत्र हेमा मालिनी यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in