• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल… संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर थेट टीका..

July 19, 2026 by admin Leave a Comment


संजय राऊत यांनी नुकताच 6 फुटीर खासदारांच्या मुद्द्यात एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे काही विनोबा भावे नाहीत. दाढी जरी असली आचार्यांप्रमाणे तरीही ते आचार्य विनोबा भावे नाहीत. की ते जे बोलतील ते सत्य आहे. मशालीवर निवडून आलेले लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेतले. मशालीच्या चिन्हावर निवडून आलेले आमचे निर्लज्ज लोक हे गद्दार आहेत. चांगले का वाईट हे सोडून द्या. मशाल चिन्हावj निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेता यात कोणते शाैर्य, नितीमत्ता आणि लोकशाही कुठे आली? याचे उत्तर त्यांनी द्यावे ना.. तुमच्या चिन्हावर जे निवडून आले ते आले ना.. आम्ही नाही म्हणतो का. पण आम्ही मशाल चिन्हावर निवडून आणले. मतं उद्धव ठाकरेंना पडलेली आहेत. मशालीली पडलेली आहेत.

तुमच्या चोरलेल्या धनुष्यबाणाला नाही. तुम्ही आम्हाला काय सांगता? एक दिवस ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल.. लक्षात घ्या.. मी पुन्हा सांगतो ही दाढी तुमची एक दिवस जाळून टाकली जाईल. दाढीवर हात फिरवून तुम्ही आम्हाला नितीमत्ता शिकू नका. तुमची जी काही आहे ती अमित शाह यांच्या पायाखाली घाण पडली आहे.

मुळात तुम्हाला अब्रू नव्हतीच. हे जे 6 लोक आहेत, त्यांना लाज वाटली पाहिजे. निर्लज्ज आहेत हे. गद्दार शब्दही यांना कमी पडेल. लोकसभेचे अध्यक्ष आहेत हे लोकशाहीचा खून, बलात्कार आहे. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. फक्त एकनाथ शिंदे यांच्यावरच नाही तर भाजपा आणि केंद्र सरकारवरही जोरदार टीका करताना संजय राऊत दिसले.

एकनाथ शिंदे यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरूनही सरकारवर जोरदार निशाणा साधला. देशात लोकशाही राहिली नसल्याचेही यादरम्यान त्यांनी म्हटले. 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर काल या बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी मंजुरी दिली आहे. यावरूनच संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! 4 भाविकांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी
  • chanakya Niti : चाणक्य यांचे फक्त 5 सल्ले ऐका, आयुष्यात होईल आमूलाग्र बदल; वाचा…
  • 1 September Rashifal : सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल, वाचा तुमच्या राशीत नेमकं काय आहे?
  • 6 ते 7 थार, 2 स्कॉर्पिओ, 3 जेसीबी, 8 ट्रॅक्टर, अनेक दुचाकी जिंकून देणाऱ्या ओम्याचा खुराक काय होता ? ऐकाल तर चाट पडाल
  • Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार ऐनवेळी संकटात सापडणार, काँग्रेसच्या 2 मंत्र्यांकडून थेट इशारा; काय घडतंय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in