• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ही झाडं म्हणजे सापांचे पक्के दोस्त, साप घरच सोडणार नाही, ठाण मांडून बसेल

August 23, 2026 by admin Leave a Comment


पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांचा धोका अधिक असतो. कारण पावसाळ्याच्या काळात साप हे बिळात नसतात, तर रस्त्यावर फिरतात. या काळात बिळात पाणी शिरल्यामुळे सापांचा निवारा नष्ट होतो. तसेच मातीमुळे बिळं देखील बुजले जातात. अशा स्थितीमध्ये साप आपल्या निवाऱ्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात असतात. अशावेळी सापांना जर तुमच्या घरात अशी जागा सापडली तर ते तिथे देखील आश्रय घेऊ शकतात. सापांना सामान्यपणे जिथे अर्द्रता जास्त आहे, अशा जागा निवाऱ्यासाठी अनुकूल असतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुमच्या परिसरात साप येण्याचं आणखी एक मुख्य कारण म्हणजे पाऊस पडल्यानंतर  अनेक ठिकाणी बेडकांची संख्या जास्त वाढते, बेडूक हे सापांचं मुख्य खाद्य असल्यामुळे देखील साप बेडकाच्या शोधात तुमच्या घरापर्यंत पोहचू शकतात, त्यामुळे काळजी घेणं गरजेचं असतं.

सर्व सामान्यपणे अशी काही झाडं असतात, जी सापांच्या निवाऱ्यासाठी नैसर्गिकरित्याच अनुकूल वातावरण निर्माण करून देतात. अशा झाडांना पालवी प्रचंड प्रमाणात असते. त्यामुळे पाऊस झाडाच्या पालवीमधून थेट जमिनीवर पोहचू शकत नाही. परंतु ही झाडं ओली झाल्यामुळे या ठिकाणी आर्द्रता प्रचंड प्रमाणात निर्माण होते. अशा झाडांच्या मुळाशी घुशी, उंदिरं यांची बिळं देखील असतात. त्यामुळे सापांना शिकारीची देखील सोय होते, तसेच या झाडांच्या मुळाशी अनेकदा अंधार असल्यामुळे सापांना इथे आश्रय घेणं सुरक्षित वाटतं, त्यामुळे अशी झाडं शक्यतो घराच्या एकदम जवळ लावू नयेत.

यामध्ये पहिलं झाडं आहे, ते म्हणजे कन्हेराचं झाडं. कन्हेराला छोटी-छोटी पानं असतात, मात्र ती खूप जास्त असतात. तसेच या झाडाच्या मुळाशी जी जमीन असते, ती भूसभुशीत असते. या झाडाच्या अवतीभोवती गवत देखील झपाट्याने वाढतं, त्यामुळे इथे बेडूक, उंदिर आणि इतर किटकांचा देखील वावर वाढतो. त्यामुळे साप अशा जागेकडे लगेच आकर्षित होतात. सापांना अशी जागा निवाऱ्यासाठी सर्वोत्तम असते.

यातलं दुसरं झाड आहे, ते म्हणजे बांबूचं, बांबूचं झाडं सर्वात झपाट्याने वाढणारं झाड आहे. परंतु बांबूच्या झाडाला पानगळ प्रचंड असते, त्यामुळे तिथे नेहमी अडचण निर्माण होते, अशा परिस्थितीमध्ये साप या ठिकाणी आपला निवारा करू शकतात.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in