
90 च्या दशकात हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक मोठे सुपरस्टार्स राज्य करत होते. गोविंदा, शाहरुख खान, सलमान खान आणि रजनीकांत यांसारख्या दिग्गजांमध्ये एक नवीन चेहरा उदयास आला आणि त्याने आपल्या वेगळ्या स्टाइलमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
हा अभिनेता म्हणजे अरविंद स्वामी. अरविंद स्वामीच्या एंट्रीनंतर इंडस्ट्रीत एक वेगळंच वातावरण निर्माण झालं. त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे आणि नैसर्गिक अभिनयामुळे तो लवकरच तरुणाईचे आवडते बनले. विशेषत मुलींमध्ये त्याची जबरदस्त क्रेझ होती. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असत.
त्याची खासियत फक्त लुक्स नव्हती तर अभिनयाची ताकदही होती. रोमँटिक असो वा भावनिक भूमिका तो प्रत्येक भूमिकेत तितक्याच सहजतेने रुळत. मोठे दिग्दर्शक त्याच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असत आणि अल्पावधीतच त्याने इंडस्ट्रीत आपली ठोस ओळख निर्माण केली.
मात्र, वेळ बदलत गेली आणि त्याच्या करिअरमध्ये अडचणी येऊ लागल्या. अनेक चित्रपट उशिरा रिलीज होऊ लागले, काही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. सततच्या अपयशामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला. याच काळात त्याने मोठा निर्णय घेतला आणि अभिनय क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
चित्रपटांपासून दूर गेल्यानंतर अरविंद स्वामीने आपल्या फॅमिली बिझनेसमध्ये लक्ष घातले. त्याच्या व्यावसायिक समज आणि योग्य निर्णयांमुळे त्याने या क्षेत्रातही मोठं यश मिळवलं. त्याने Talent Maximus ही कंपनी स्थापन केली. जी पुढे जाऊन मोठ्या स्तरावर पोहोचली. आज तो 3300 कोटींचा मालक आहे.




Leave a Reply