• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

स्वातंत्र्यदिनी अक्षय आणि टायगर श्रॉफने मैदानात केलं ध्वजारोहण, खिलाडी कुमारच्या कृतीने मन जिंकलं Video

August 15, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड स्टार आणि ॲक्शन हिरो म्हणून ख्याती असलेल्या अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केला. मुंबईत सकाळी क्रिकेट खेळत असताना या दोन्ही स्टार्संनी उत्स्फूर्त देशभक्ती दाखवत मैदानातच ध्वजारोहण सोहळा पार पाडला. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ नेहमीप्रमाणे सकाळी मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. स्वातंत्र्य दिन असल्याचं त्यांच्या लक्षात होतं. यावेळी खेळ रंगात आला असतानाच सामना थांबवला आणि स्वातंत्र्यदिन साजरा केला. मैदानाती ध्वजारोहणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अक्षय कुमारच्या कृतीचं कौतुक होत आहे.

भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनी मैदानात राष्ट्रध्वज आणल्यानंतर फडकवण्यासाठी कोणताही खांब नव्हता. अशा परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा मान राखत अक्षय कुमारने प्रथम पायतले बूट काढले आणि तिरंगा हाती घेऊन एका खूर्चीवर उभा राहिला. अक्षय कुमारने राष्ट्रध्वज उंचावल्यानंतर टायगर श्रॉफसहित उपस्थित असलेल्या सर्वांनी सलामी दिली. त्यानंतर अभिमानाने राष्ट्रगीत गायलं. ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर स्टार्स इतरांनी क्रिकेट खेळाला पुन्हा सुरूवात केली.

Akshay Kumar and Tiger Shroff were playing cricket this morning as usual.

While playing cricket, they remembered that today is August 15, Independence Day. So Akshay Kumar and Tiger Shroff stopped the cricket match and got the Indian national flag brought there.

Since there was… pic.twitter.com/KRcQwuZE3W

— Saffron Chargers (@SaffronChargers) August 15, 2026

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या असून कौतुक केलं आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ नुसते पडद्यावरचेच नाही तर खऱ्या आयुष्यात हिरो असल्याची प्रतिक्रिया काही युजर्संनी नोंदवली आहे.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी आजवर अनेक देशभक्तीपर चित्रपटात काम केलं आहे. अक्षय कुमारचे केसरी, एअरलिफ्ट, बेबी, रूस्तम, मिशन मंगल, हॉलिडे असे अनेक चित्रपट रुपेरी पडद्यावर गाजले आहे. टायगर श्रॉफने त्याच्या हाय-व्होल्टेज ॲक्शन स्टाईलचा वापर करून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या भूमिका साकारल्या आहेत.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in