• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

स्टेज 4 कॅन्सरवर मात केल्यानंतर संजय दत्त पुन्हा हॉस्पिटलमध्ये, कशी आहे तब्येत?

May 21, 2026 by admin Leave a Comment


Sanjay Dutt : बॉलिवूडमधील ‘बाबा’ म्हणून ओळखला जाणारा संजय दत्त पुन्हा एकदा त्याच्या प्रकृतीमुळे चर्चेत आला आहे. स्टेज 4 फुफ्फुसाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारावर यशस्वी मात केल्यानंतर आता तो नियमित वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेत पोहोचला आहे. अलीकडेच त्याला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले होते. त्यानंतर तो हेल्थ मॉनिटरिंगसाठी अमेरिकेला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

संजय दत्तची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे त्याच्या जवळच्या व्यक्तींने सांगितले आहे. मात्र, त्याच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या 66 वर्षांचा असलेला संजय दत्त आजही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. त्याच्या आगामी ‘आखिरी सवाल’ या चित्रपटामुळे तो चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असतानाच त्याने आरोग्यालाही प्राधान्य देत अमेरिकेत वैद्यकीय तपासणीसाठी जाण्याचा निर्णय घेतला.

रिपोर्ट्सनुसार, संजय दत्त सध्या Los Angeles येथे असून त्याच्यासोबत त्याचे जवळचे मित्र परेश घेलानी आहेत. गेल्या आठवड्यात तो एकटाच अमेरिकेला रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमांदरम्यान त्याने मेडिकल चेकअपसाठी वेळ काढला. त्याचा ‘आखिरी सवाल’ हा चित्रपट 15 मे रोजी प्रदर्शित झाला असून त्याच दरम्यान त्याने आरोग्य तपासणीही करून घेतल्याचे समजते.

नियमितपणे घेतो डॉक्टरांचा सल्ला

गेल्या काही वर्षांपासून संजय दत्त नियमितपणे अमेरिकेला जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. रिपोर्ट्सनुसार, तो Memorial Sloan Kettering Cancer Center येथे नियमित तपासणी करून घेतो. यावेळी त्याने कॅलिफोर्नियामधील काही वैद्यकीय तज्ज्ञांचीही भेट घेतल्याची चर्चा आहे. मात्र, त्याच्या जवळच्या व्यक्तींनी स्पष्ट केले आहे की ही केवळ नियमित हेल्थ चेकअप प्रक्रिया असून त्याच्या प्रकृतीबाबत चिंतेचे कोणतेही कारण नाही.

सन 2020 मध्ये संजय दत्तची प्रकृती अचानक बिघडली होती. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि फुफ्फुसात पाणी साचल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्याला स्टेज 4 लंग कॅन्सर असल्याचे निदान झाले होते.

ही बातमी समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, दीर्घ उपचार आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याने या गंभीर आजारावर मात केली. ऑक्टोबर 2020 मध्ये त्याला कॅन्सरमुक्त घोषित करण्यात आले होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठा दिलासा निर्माण झाला होता.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in