• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

स्टिलच्या प्रत्येक पाणी बॉटलच्या खाली 303 का लिहिलं जातं? दररोज वापरता पण तुम्हालाही माहीत नसणार खरं कारण

August 3, 2026 by admin Leave a Comment


तुम्ही घरात असाल अथवा ऑफिसमध्ये किंवा कुठे तरी बाहेर फिरण्यासाठी गेला असाल तुमच्याकडे पाणी पिण्यासाठी एक स्टीलची बॉटल असतेच, आज काल प्रत्येकजण ऑफिसमध्ये पाणी पिण्यासाठी स्टीलच्या बाटलीचा वापर करतो. प्लॅस्टिक बॉटलच्या तुलनेत स्टीलच्या बाटलीने पाणी पिण्याचे अनेक फायदे देखील आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात स्टीलच्या बाटलीला मागणी देखील वाढली आहे. परंतु तुम्ही कधी त्या बाटलीला उलटी करून पाहिलं आहे का? त्या बाटलीच्या खाली 303 असा आकडा लिहिलेला असतो. तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का? की स्टीलच्या प्रत्येक बाटलीच्या खाली 303 हा नंबर का लिहिला जातो? अनेकांचा हा आकडा पाहून असा समज होतो की, हा आकडा म्हणजे कंपनीचा सिरिअल नंबर असेल किंवा त्या बाटलीच्या डिझाइनचा भाग असेल. परंतु तुम्ही जसा विचार करता असं काही नाही तर या नंबरचा संबंध हा बाटलीच्या क्वॉलिटीशी आहे.

बाटलीवर 303 आकडाच का टाकला जातो

बाटलीवर टाकला जाणारा 303 हा आकडा एखादा रँडम नंबर नाहीये तर ती एस स्टेनलेस स्टीलची ग्रेड आहे. या नंबरवरून तुम्हाला माहिती होतं की, तुम्ही पाणी पिण्यासाठी जी बाटली वापरत आहात ती बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचं स्टील वापरलेलं आहे. ज्या बाटलीच्या खाली 303 लिहिलं आहे, ती बाटली बनवण्यासाठी जे स्टील वापरण्यात येतं ते प्रमामुख्याने क्रोमियम (Chromium) आणि निकेल (Nickel) पासून बनवलं जातं, ज्यामध्ये थोड्या प्रमाणात सल्फर देखील मिक्स केलेलं असतं. या प्रकारचं स्टील थोडं सॉफ्ट असल्यामुळे अशा स्टिलला मशीनमध्ये बाटलीचा आकार देणं खूप सोप असतं.

परंतु ज्या बॉटलवर 403 लिहिलेलं असतं, ती बॉटल एका दुसऱ्या प्रकारच्या विशिष्ट स्टीलपासून बनवलेली असते. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की 303 स्टीलची बाटली की 403 स्टीलची बाटली कोणत्या स्टीलच्या ग्रेडपासून बनवलेली बाटली पाणी पिण्यासाठी उत्तम असते. तर 303 ग्रेडच्या स्टीलपासून ज्या पाण्याच्या बाटल्या तयार केल्या जातात त्या पाणी पिण्यासाठी योग्यच असतात, परंतु त्याला गंज लागू शकतो. परंतु ज्या बाटल्या या 403 स्टीलच्या ग्रेडपासून बनवल्या जातात अशा बाटल्यांना गंज लागत नाही.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in