• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सोहेल खानसोबत घटस्फोटानंतर पहिल्यांदाच मनमोकळं बोलली सीमा सजदेह; म्हणाली, ‘आता मी…’

August 20, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता सोहेल खान (Sohail Khan) याची पूर्व पत्नी सीमा सजदेह (Seema Sajdeh) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  ‘अलायन्स’ ( Alliance) मध्ये तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्याच शोमध्ये सोहेलही सहभागी झाला होता. दोघांच्या नात्याबद्दल बरीच चर्चाही झाली. त्यानंतर सीमा आता नेहाच्या ‘डबल डेट’ या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली. या पॉडकास्टमध्ये सीमाने सोहेल खानसोबतच्या घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल तसेच कॉस्मेटिक ट्रीटमेंटबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं.

कॉस्मेटिक ट्रीटमेंटबद्दल सीमाने काय सांगितलं ?

मी स्वतःची काळजी घेण्यावर भर देते, असं सीमाने सांगितलं. मी लेझर ट्रीटमेंट करून घेतली, असंही तिने नमूद केलं. मात्र असं असलं तरी आता कोणतीही कॉस्मेटिक ट्रीटमेंट करून घेण्यापूर्वी मी अधिक विचार करते, गरज असेल तरच आणि तेव्हाच ट्रीटमेंट करून घेते, असं सीमाने स्पष्ट केलं.

घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल सीमा म्हणाली..

अनेक वर्षांच्या संसारानंतर सीमा आणि सोहेल खान काही वर्षांपूर्वी वेगळे झाले, त्यांनी घटस्फोट घेतला. याची बरीच चर्चाही झाली. मात्र सोहेल खानपासून वेगळं झाल्यानंतर आयुष्यात अनेक बदल झाले. याबद्दल बोलताना सीमना सांगितलं, , आता मी माझ्या स्वत:च्या सानिध्यात, माझ्या कंपनीत अधिक कम्फर्टेबल आहे. दिवसभराचा व्यस्त वेळ संपल्यानंतर घरी जाऊन कुत्र्यासोबत वेळ घालवण्याची मला उत्सुकता असते, असं ती म्हणाली. “मी स्वतःसोब खूप आनंदी आहे” असं म्हणत सीमाने आपल्या सध्याच्या आयुष्याबद्दल समाधान व्यक्त केलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Seema Kiran Sajdeh (@seemakiransajdeh)

‘अलायन्स’ मध्ये सोहेलसाठी आव्हानात्मक अनुभव

यावेळी बोलताना सीमाने ‘अलायन्स’ शोचा अनुभवही सांगितला. ‘ मला असं वाटतं की माझ्यापेक्षा सोहेलसाठी हा शो अधिक आव्हानात्मक होता’, असं सीमा म्हणाली. ‘खरं सांगयाचं झालं तर सोहेल लोकांमध्ये सहज मिसळतो, पण तो फार बोलका नाहीये. आपल्या आजूबाजूला ओळखीचे आणि जवळेच लोक असावेत, असं वातावरण त्याला आवडतं. तो त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये खुश असतो’, असंही सीमाने नमूद केलं.

‘हा शो जसजसा पुढे गेला, तसतसा सोहेलला कुटुंबाची आणि मुलांची आठवण येऊ लागली. मी तिथे होते, त्यामुळे सोहेलला काही प्रमाणात कुटुंबासोबत असल्यासारखं वाटत होतं,’ असंही सीमा म्हणाली. पण मी जेव्हा ‘अलायन्स’मधून बाहेर पडत होते, तेव्हा सोहेल खूप भावूक झाला होता. ‘ तू का जातेस ? तुझ्या जागी मला जाऊ दे,’ असं त्याने त्यावेळी म्हटलं होतं, असंही सीमाने सांगितलं.

सांगायचं झालं तर 1998 साली सीमा आणि सोहले खान यांचं लग्न झालं होतं, योहान आणि निर्वाण अशी दोन मुलं त्यांना आहेत. त्यांचं वैवाहिक जीवन तब्बल 24 वर्षं टिकलं. मात्र आता दोघेही वेगळे झाले आहेत.

 





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in