• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार; शरद पवार थेट बोलले

July 18, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीकडून नीट पेपरफुटीवरून आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचूक हे गेल्या 20 दिवसांपासून आंदोलनाला बसले होते. परंतु आज दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांना कोर्ट आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईने जंतर-मंतर उपोषणस्थळी मोठा गोंधळ झालाय. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

शरद पवार म्हणाले, पाच-सहा दिवसांत अटक करतील, नेमकं तसं झालं आहे. त्यांची मागणी काय होती, तर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा… का तर…त्यांच्याकडे शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी होती. परंतु त्यांनी ती जबाबदारी काळजीपूर्वक हाताळली नाही. त्यांच्या परिणाम हजारो विद्यार्थ्यांवर झाला. आंदोलनातून मागणी होत आहे, तरी केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. शेवटी त्यांच्या मागणीसाठी इतर राजकीय पक्ष देखील उभे राहिले’.

‘काँग्रेसच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी गेले. राष्ट्रवादीच्या वतीने सुप्रिया सुळे गेल्या. सर्व जण एक सामूहिक मागणी करत होते. हे आवाक्याच्या बाहेर गेल्याचं लक्षात आलं, त्यानंतर अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अटकसत्र झालं. बघुयात. सोनम वांगचूक यांना अटक जरी झाली, तरी आंदोलन सुरू राहणार. मागणी रास्त होती. विद्यार्थ्यांसाठी होती, असे शरद पवार यांनी सांगितले. 20 दिवसांत दिल्लीत असूनही तुम्ही भेटायला येत नाही. हे आंदोलन सुरूच राहील. या विषयानेच संसदेला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले.

नाना पटोले काय म्हणाले?

काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले, ‘येत्या 20 तारखेला त्यांचा संसदेवर मार्च होणार होता. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांना ताब्यात घेतलं असेल. ज्या पद्धतीने मोदी सरकार नवीन पिढीचं आयुष्य खराब करत आहे. त्यांनाही आताही नीटचे निकाल आले. त्याची मार्कशीटमध्येही घोळ आहे. तो नवा घोटाळा आहे. साध्या परीक्षा देखील सरकार पारदर्शक घेऊ शकत नाही. या नवीन पिढी बरबाद करत आहे. त्यामुळे ही पिढी उठली आहे. राहुल यांच्याही तरुणांसाठी सभा झाल्या. तरुणांच्या मनात राग आहे. तो राग वांगचूक यांच्या आंदोलनातून पुढे येत होते. नरेंद्र मोदी हे अमेरिकेला सरेंडर होतील. पण देशातील लोकांवर दडपशाही आणत आहे’.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! 4 भाविकांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी
  • chanakya Niti : चाणक्य यांचे फक्त 5 सल्ले ऐका, आयुष्यात होईल आमूलाग्र बदल; वाचा…
  • 1 September Rashifal : सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल, वाचा तुमच्या राशीत नेमकं काय आहे?
  • 6 ते 7 थार, 2 स्कॉर्पिओ, 3 जेसीबी, 8 ट्रॅक्टर, अनेक दुचाकी जिंकून देणाऱ्या ओम्याचा खुराक काय होता ? ऐकाल तर चाट पडाल
  • Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार ऐनवेळी संकटात सापडणार, काँग्रेसच्या 2 मंत्र्यांकडून थेट इशारा; काय घडतंय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in