• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सैफ अली खान याच्या लेकाने दिला थेट अभिनेत्रीला धक्का, कॅमेऱ्यात हैराण करणारा प्रकार कैद, थेट पायऱ्यांनीच..

June 4, 2026 by admin Leave a Comment


सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान त्याच्या कामापेक्षा जास्त त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. वडील सैफ अली खान आणि बहीण सारा अली खान यांच्याप्रमाणे त्याला बॉलिवूडमध्ये नाव अजूनतरी कमावता आले नाही. गेल्या काही दिवसांपासून इब्राहिम अली खान आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी चर्चेत आहेत. दोघांचे प्रेमसंबंध चर्चेत आहेत. दोघांचे सतत नाव जोडले जात आहेत. दोघे अनेकादा एकत्र स्पॉट होताना देखील दिसतात. यादरम्यानच एक हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये इब्राहिम अली खान याच्यामागे पलक तिवारी येताना दिसत आहे. मात्र, अचानक इब्राहिम अली खान हा पलकला धक्का देतो आणि मागे पायऱ्यांमध्ये लपण्याचा इशारा करतो. यादरम्यान पलकही इब्राहिम अली खान याच्या इशाऱ्यानंतर थेट पार्किंगकडे पळताना दिसत आहे. आता हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे.

पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान कायमच चर्चेत आहेत. दोघे एकत्र स्पॉट होतात. अनेक दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यांनी आपल्या नात्यावर कधीच भाष्य केले नाही. सध्या जो व्हिडीओ व्हायरल होत आहे तो बरेच काही सांगून जात आहे. मुंबईतील जुहू परिसरातील एका पीव्हीआरमधील हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे.

इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी हे दोघेजण चित्रपट पाहण्याकरिता एकत्र गेले होते. चित्रपट संपताच तिथून ते निघत होते. त्यांना कल्पना नव्हती की, पापाराझींची गर्दी रस्त्यावर आहे. इब्राहिम एका कॉरिडॉरमधून चालत होता. तो फोनवर बोलत पुढे येत असताना त्यांच्या लक्षात येते की, पुढे पापाराझी आहेत.

तो पटकन एका क्षणाचाही वेळ न घालवता थेट मागे वळतो आणि त्याचवेळी त्याच्या मागे येणाऱ्या पलक तिवारीला मागे ढकलतो. कॅमेऱ्यात सर्व कैद झाले की, कशाप्रकारे त्याने पलक तिवारीला मागे ढकलले. त्यानंतर पलक तिवारीही पायऱ्यांनी झटपट खाली जाते. इब्राहिम अली खानला ज्याची भीती तेच घडले आणि पलक तिवारी देखील कॅमेऱ्यात कैद झाली. पलक तिवारी हिने तोंडाला मास्क लावल्याचेही यादरम्यान दिसत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘तारक मेहता..’मधील ‘बाघा’वर कोसळला दु:खाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन
  • रेशन वितरण प्रणालीत मोठा बदल, या कुटुंबांना आता कमी धान्य मिळणार; सरकारचा प्रस्तावित निर्णय काय?
  • ‘या’ 5 ठिकाणी जेवण करणे अशुभ, असं करताय तर आजच व्हा सावध, कारण…
  • Ketan Agarwal Case: मोठी अपडेट! पोलिसांसमोर सिया गोयलने थेट… केतन अग्रवाल प्रकरणात खळबळजनक माहिती
  • प्रिन्स ठरला किंगपेक्षा भारी, ICC वनडे रँकिंगमध्ये गिलचा फायदा, तर कोहली मोठे नुकसान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in