• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सीजेपी आंदोलनादरम्यान दहशत निर्माण करण्याचा मोठा कट; जैशच्या दहशतवाद्याच्या गर्लफ्रेंडलाही अटक, काय होता प्लॅन?

August 2, 2026 by admin Leave a Comment


पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कृती दलाने (STF) जैश-ए-मोहम्मदशी संबंधित एका संशयित मॉड्यूलच्या प्रकरणात मोठं यश मिळवलं आहे. एसटीएफचे आयजी गौरव शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली आहे. पूर्व बर्दवानमधून अटक करण्यात आलेला संशयित हमीम मंडल हा पाकिस्तानमधील हँडलर्सच्या सतत संपर्कात होता. दिल्लीतल्या जंतर-मंतर इथल्या आंदोलनादरम्यान तो पोलिसांचा गणवेश घालून हिंसाचार पसरवण्याचा कट रचत होता, असं शर्मा यांनी सांगितलं. त्याची कथित साथीदार आणि गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला झारखंडच्या साहिबगंजमधून अटक करण्यात आली आहे.

एसटीएफचे आयजी गौरव शर्मा यांनी सांगितलं की, अर्पिता सरकारला झारखंडच्या साहिबगंज इथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सर्व्हिलान्सच्या मदतीने तिच्यावर पाळत ठेवून तिच्या ठिकाणाचा माग काढला. तिला अटक करून पश्चिम बंगालमध्ये नेण्यात आलं असून तिथेच तिची पुढील चौकशी केली जाईल. दिल्लीतल्या जंतर-मंतर इथल्या आंदोलनाशी हमीमचा काय संबंध आहे, याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती शर्मा यांनी दिली. त्याचप्रमाणे हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

जैश-ए-मोहम्मदच्या गटाच्या संपर्कात

या प्रकरणातील मुख्य आरोपी हमीम मंडल याला पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून आधीच अटक करण्यात आली होती. हमीम हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका संशयित गटाच्या संपर्कात होता, असा आरोप पोलिसांनी केला आहे. त्याच्या मोबाइल फोन आणि इतर डिजिटल उपकरणांमधून जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे तपासात असा दावा करण्यात आला आहे की तो त्याच्या सूत्रधारांच्या सतत संपर्कात होता. हमीमच्या चौकशीतून अनेक महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. हमीम व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि इतर मेसेजिंग अॅप्सद्वारे त्याच्या सूत्रधारांच्या संपर्कात होता, असं आयजी गौरव शर्मा यांनी सांगितलं आहे. तो एनक्रिप्टेड चॅट्सचा वापर करत होता आणि तरुणांचं ब्रेनवॉशिंग करून त्यांना दहशतवाद्यांच्या नेटवर्कमध्ये भरती करण्याचा प्रयत्न करत होता, असाही दावा एसटीएफने केला आहे.

आंदोलनादरम्यान हिंसाचाराचा मोठा कट

पोलिसांच्या चौकशीदरम्यान हमीमने खुलासा केला की, जवळपास दहा ते बारा दिवसांपूर्वी हम्माद नावाच्या एका पाकिस्तानी नागरिकाने त्याला पोलिसांचे गणवेश खरेदी करण्याचे निर्देश दिले होते. हम्माद हा शहजाद भट्टी गँगचा साथीदार होता. जंतर-मंतर इथल्या सीजेपीच्या आंदोलनादरम्यान वापरण्यासाठी हे गणवेश दिल्लीतल्या एका बस स्थानकावर पोहोचवायचे होते. हे गणवेश आत्मघाती हल्लेखोरांकडून वापरले जाणार होते. मात्र पेमेंटशी संबंधित काही मुद्द्यांमुळे ही योजना प्रत्यक्षात उतरू शकली नव्हती.

तपासात असंही उघड झालं की, स्थानिक मंत्री उमेश राय हेदेखील दहशतवाद्यांचं लक्ष्य होते. एसटीएफने दावा केला आहे की, हमीम आणि त्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकार यांनी उमेश राय यांच्या मुलाला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा कट रचला होता.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in