• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सलमानला रडताना पाहून चाहत्यांच्या डोळ्यांतही अश्रूंची दाटी, 27 वर्षांनंतरही हे गाणं ऐकताच पाणावतात डोळे..

August 22, 2026 by admin Leave a Comment


माणूस प्रेमात पडला काय किंवा त्याचा हृदयभंग झाला काय, संगीत, गाणं या गोष्टीच त्याची नेहमी साथ देतात, काही काळ तारतात. प्रेमात पडल्यावर लोकं बॉलिवूडची रोमँटिक अंदाजातील गाणी ऐकतात आणि जर प्रेम असफल ठरलं, हृदयभंग झाला तर मग बॉलिवूडमधलीच थोडी सॅड साँग्स ऐकुन मन हलकं करण्याचा प्रयत्न करतात. असंच एक गाणं आहे जे प्रेमभंग झालेल्या प्रत्येक तरूणाचं आवडतं आहे. हृदय तुटण्याचं दु:ख आणि त्या वेदना अगदी चपखलपणे मांडणारं गाणं, तुम्हीही कधी ना कधी नक्कीच गुणगुणलं असेल. हे गाणं खास असण्याचं आणखी एक कारण म्हणजे ते सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्यावर शूट झालं होतं. बॉलिवूडच्या या जोडीची प्रेमकहाणी तर खूप गाजली, पण ती काही यशस्वी होऊ शकली नाही.

कोणतं आहे ते गाणं ?

हे गाण कोणतं ते आत्तापर्यंत अनेकांनी ओळखलं असेलच. प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनाला भिडणारं हे गाणं म्हणजे ‘तड़प-तड़प के इस दिल से आह निकलती रही’. संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ हम दिल दे चुके सनम’ या 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातलं हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील या गाण्यातून प्रेम, विरह आणि वेदना यांचं प्रभावी चित्रण दाखवलं आहे.

पहाटे 4 वाजता झालं गाण्याचं रेकॉर्डिंग

आणि या अजरामर गाण्याला आवाज दिला होता लोकप्रिय गायक केके याने. विशेष म्हणजे हे गाणं गाण्यास केके सुरुवातीला तयार नव्हता. हे आपल्या स्टाईलचं गाणं नाहीये असं म्हणत त्याने आधी नकार दिला होता. मात्र संगीतकार इस्माईल दरबार यांनी त्याला हे गाणं गाण्यासाठी तयार केलं. त्यांनी केकेला रात्री स्टुडिओमध्येच थांबवलं आणि पहाटे 4 वाजता त्याच्याकडून या गाण्याचं रेकॉर्डिंग करून घेतलं. हे गाणं एवढं प्रभावी झालं होतं की, ते ऐकताना केकेच्या पत्नीच्या डोळ्यांतही अश्रू आले होते. आजही ‘तड़प-तड़प’ हे गाणं ऐकलं की प्रेमातील वेदना, विरह आणि आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. म्हणूनच हे गाणं आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात भावूक गाण्यांपैकी एक मानलं जातं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in