• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सलमानच्या पनवेलमधील फार्महाऊसवर कोणाला प्रवेश मिळतो? आयुष शर्माने सांगूनच टाकलं

July 20, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे पनवेलजवळील आलिशान फार्महाऊस नेहमीच चर्चेत असते. अनेक सेलिब्रिटी, मित्रमंडळी आणि कुटुंबीय येथे वेळ घालवताना दिसतात. मात्र, या फार्महाऊसमध्ये कोणालाही सहज प्रवेश मिळत नाही. सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मा याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा एक रंजक किस्सा सांगितला.

'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत आयुष म्हणाला की, सलमान खान स्वतः ज्यांना निमंत्रण देतो, त्यांनाच फार्महाऊसमध्ये जाण्याची परवानगी असते. सलमानच्या परवानगीशिवाय तेथे प्रवेश मिळत नाही. त्यामुळे भाईने फार्महाऊसवर बोलावलं तर तिथे जाता येत.

आयुषने पुढे सांगितले की, फार्महाऊसवर गेल्यानंतर आणखी एक मजेशीर गोष्ट घडते. सलमान खान त्याचा बराचसा वेळ तिथेच घालवत असल्याने पाहुणे स्वतःच्या इच्छेने तिथे जातात; मात्र परत कधी निघायचे, हे सलमानच ठरवतो. तो परवानगी देईपर्यंत पाहुण्यांना तिथेच थांबावे लागते असेही आयुषने हसत-हसत सांगितले.

याच मुलाखतीत आयुषने सलमान खानसोबतच्या पहिल्या भेटीची आठवणही सांगितली. त्यावेळी तो अभिनय क्षेत्रात संघर्ष करत होता. सलमानने त्याच्यात चांगला अभिनेता होण्याची क्षमता असल्याचे सांगितले, पण त्याचवेळी तो अद्याप पूर्णपणे तयार नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगून अभिनयासोबत इतर अनेक गोष्टींवर मेहनत घेण्याचा सल्लाही दिला.

दरम्यान, आयुष शर्मा आणि सलमान खानची बहीण अर्पिता खान यांचा 18 नोव्हेंबर 2014 रोजी हैदराबादमधील फलकनुमा पॅलेसमध्ये भव्य विवाहसोहळा पार पडला होता. या दाम्पत्याला आहिल आणि आयत अशी दोन मुले आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दुबईत क्रेन चालवणाऱ्याला लाखोंनी पगार, भारतातल्या इंजिनिअरपेक्षाही…आकडा वाचून चकित व्हाल!
  • बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, मी फक्त बघत बसलो… महायुतीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली खदखद
  • केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
  • Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
  • Chanakya Niti : आयुष्यात या तीन चुका कधीच करू नका, येईल पश्चातापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in