• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सरकार पोरांना घाबरलंय, 56 इंच वाल्यांची हातभर… संजय राऊत यांनी केंद्र सरकारला डिवचलं; ट्विटमध्ये ईडीचा उल्लेख

July 20, 2026 by admin Leave a Comment


संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. आणि आजच्याच दिवशी कॉकरोच जनता पार्टीतर्फे संसदेवर शांतीपूर्ण मोर्चाही काढण्यात येणार आहे. नीट (NEET Exam) परीक्षेतील कथित गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून दिल्लीच्या जंतरमंतर (Jantar Mantar)येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषण करत होते, मात्र शनिवारी सकाळी त्यांना तेथून हटवून जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र यामुळे सीजेपी समर्थक, कार्यतकर्त्यांवी हार न मानता आंदोलन कायम ठेवलं असून सीजपेची संस्थापक अभिजीत दिपके हे उपोषणास बसले. आज सीजेपीतर्फे विविध मागण्यांसाठी संसदेवर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.  सुरक्षा यंत्रणांमुळे संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप मिळालं आहे. आज सकाळपासूनच दिल्लीतील जंतरमंतर परिसरात दिल्ली पोलीस तसेच रॅपिड ॲक्शन फोर्स आणि निमलष्करी दलांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अतिशय गोंधळाचं वातावरण आहे.

याच पार्श्वभूमीवर आता सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर टीकास्त्र चढवलं आहे. राऊत यांनी एक ट्विट केलं असून सरकारवर हल्लाबोल चढवला. सरकार पोरांना घाबरलेय! शुद्ध मराठीत सांगायचे तर ५६ इंच वाल्यांची हातभार फाटलीय! अशा शब्दांत राऊत कडाडले.

काय आहे संय राऊत यांचं ट्विट ?

सरकार पोरांना घाबरलेय! शुद्ध मराठीत सांगायचे तर ५६ इंच वाल्यांची हातभार फाटलीय!
डरो मत!
संसदेवरील मार्चला परवानगी नाकारली; शक्य असते तर जंतर मंतर वरील लाखो लोकांना ED लावली असती ; पण ते कठीण आहे!
मोर्चा चा मार्ग ED च्या दिशेने वळवायला हवा! Ed,सुप्रीम कोर्ट या सारख्या संस्था मोदी शहांच्या गुलाम झाल्या आहेत!

असं राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीलं आहे.

 

सरकार पोरांना घाबरलेय!
शुद्ध मराठीत सांगायचे तर ५६ इंच वाल्यांची हातभार फाटलीय!
डरो मत!
संसदेवरील मार्चला परवानगी नाकारली;
शक्य असते तर जंतर मंतर वरील लाखो लोकांना ED लावली असती ;
पण ते कठीण आहे!
मोर्चा चा मार्ग ED च्या दिशेने वळवायला हवा!
Ed,सुप्रीम कोर्ट या सारख्या संस्था मोदी… https://t.co/XvIUVwQeRx

— Sanjay Raut (@rautsanjay61) July 20, 2026

 

यापूर्वी सकाळी माध्यमांशी संवाद साधतानाही राऊतांनी याच मुद्यावरून सरकारवर टीका केली होती. हे सरकार मुलांना पूर्णपणे घाबरलं आहे. सरकारला वाटल ह्यांना किड्या, मुंग्यासारख चिरडणार. पण हे झुरळ फार खंबीर आहे अनेक ठिकाणी त्यांना समर्थन मिळतंय, असं राऊत म्हणाले होते. एवढंच नव्हे तर सर्व कोर्ट हे, प्रधानमंत्री आणि गुहमंत्री ह्यांचं गुलाम आहे. प्रत्येक पार्टीला भाजपाने खरेदी केलं आहे. 50-50 लाखाला खरेदी केलं आहे, असा घणाघाती आरोपही राऊत यांनी केलाय.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Naveet Rana | उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील! नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लीबोल
  • ‘अभिनेत्याशी लग्न म्हणजे…’ अर्शद वारसीशी लग्नाआधी जया बच्चन यांनी मारियाला दिला होता इशारा
  • Manoj Jarange Patil: आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकऱ्याने उचललं मोठं पाऊल, शेतातलं पिकच… होतंय कौतुक
  • Sanjay Raut Meet Raj Thackeray | राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर संजय राऊत दाखल; बंद दाराआड तासभर चर्चा, नेमकं काय शिजतंय?
  • Aditi Tatkare PRO: धक्कादायक! आदिती तटकरे यांच्या पीआरओचा अचानक मृत्यू; नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in