• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सरकारी अधिकार्‍यांच्या खुर्चीवर अजूनही का वापरतात ‘पांढरा टॉवेल’? साहेबीपणा की ब्रिटिशांची परंपरा?

April 22, 2026 by admin Leave a Comment


Use of White towels in Government Officials Chair: अनेकदा आपण सरकारी कार्यालयात जातो, तेव्हा अधिकाऱ्याच्या खुर्चीवर आपली नजर खिळते. अनेक मोठ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर पांढरा टॉवेल तुम्हाला हमखास दिसतो. आजकाल अधिकाऱ्यांची दालन अशी काही सजली आहेत की विचारता सोय नाही. या दालनात एसी, मोठा टेबल, आरामदायक खुर्ची आणि दिवाबत्तीची व्यवस्था अगदी चोख असते. कार्यालयं आता चकाचक असतात. पण असे असले तरी खुर्चीवरचा पांढरा टॉवेलने त्याची जागा सोडलेली नाही. या टॉवेलचा साहेबीपणा गेलेला नाही.

ब्रिटिशांची देणगी

ब्रिटिशांच्या शासन काळात खुर्चीवर पांढरा टॉवेल टाकण्याची प्रथा होती. त्याकाळी इंग्रज अधिकारी हे भारताच्या धुळीने माखलेल्या रस्त्यावर घोडागाडीत ये जा करायचे. तेव्हा कार्यालयात दाखल होण्यापूर्वी इंग्रज अधिकारी हातपाय धुवून या खुर्चीवर बसायचे. तेव्हा पाठीमागे मुद्दाम पांढरा टॉवेल टाकायचे. त्यामुळे खर्ची खराब व्हायची नाही. पांढरा टॉवेल खराब झाला तरी तो धुतल्या जायचा. पुढे हा पांढरा कपडा या खुर्चीसाठी वर्दी झाला. अधिकाऱ्याला या पांढऱ्या टॉवेलची भुरळ पडली.अर्थात यापूर्वी सरकारी कार्यालयात एसी नव्हते. त्यामुळे घामाने कोमजलेल्या कपड्यासह खुर्चीवर बसणे असह्य व्हायचे. पुढे फॅन आले. कुलरही आले. आता एसी आले. पण ब्रिटिशांची ही निशाणी आजही अनेक अधिकाऱ्यांच्या खुर्चीची शान वाढवत आहे.

पांढरा टॉवेल स्टेट्‍स सिम्बॉल

वाढत्या उष्णतेमुळे कार्यालायातील पंखा आणि एससी सु्द्धा मान टाकतो. अनेकदा कार्यालयात वीज जाते. अशावेळी पांढरा टॉवेल अधिकाऱ्यांसाठी चांगला असतो. तो घामाने खुर्ची खराब होऊ देत नाही. तर खुर्चीचे कोणतेही डाग अधिकाऱ्यांच्या कपड्यांना लागत नाही. आता प्रशासकीय सेवेत अनेक कार्यालयात पांढरा टॉवेल हा स्टेट्‍स सिम्बॉल आहे. पदानुक्रम ठरवण्यासाठी हस्ताक्षर करण्यासाठीचा हिरवा अथवा लाल रंगाच्या पेनाचा वापर करतात. तसेच खुर्चीवरील पांढरा टॉवेल हा त्या व्यक्तीचे स्थान माहात्म्य दर्शवते.

ब्रिटिश पंरपरा पांढऱ्या टॉवलेने जपली

भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी खुर्चीवर पांढरा टॉवेल हा शिष्टाचाराच एक भाग मानल्या जातो. अर्थात नवीन दमाच्या अनेक अधिकाऱ्यांनी पांढरा टॉवेल ऐवजी दुसरी सुती कपडा वापरण्यास सुरुवात केली आहे. आरामदायक आणि जाळीदार खुर्चीची मागणी वाढली आहे. त्यामुळे काही बड्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आता पांढरे टॉवेल दिसत नाहीत. तर काही अधिकाऱ्यांना त्याचा मोह कायम असल्याचे दिसते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुमच्याही घरात साप लपलाय का? या 4 गोष्टी दिसल्या तर सावध व्हा, तिथे साप असतोच
  • 5 मिनिटे 11 सेकंदांचे ते रडवणारे गाणे, प्रेमात फसवणूक झालेल्या प्रेमींचा आधार बनले; 31 वर्षांनंतरही होतय ट्रेंड
  • इराणचा भारताला सर्वात मोठा धक्का, आधी जहाजांवर फायरिंग आता तर थेट.., शत्रूही असं वागणार नाही
  • अखेर ४८ तासांनी इराणने अमेरिकेचा मोठा बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळ, एकाच्या बदल्यात तीन….
  • Cricket : टी 20i मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी टीम जाहीर, या खेळाडूकडे नेतृत्व, पहिला सामना कधी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in