• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सरकारकडून 30 जीवनावश्यक औषधांच्या किंमती निश्चित; MRP पेक्षा जास्त आकारता येणार नाही पैसे

May 31, 2026 by admin Leave a Comment


सरकारने मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांच्यासाठी दररोज किंवा दीर्घ काळासाठी घ्याव्या लागणाऱ्या 30 अत्यावश्यक औषधांच्या एमआरपी (MRP) निश्चित केल्या आहेत. म्हणजेच आता कोणतीही फार्मसी या औषधांसाठी निर्धारित एमआरपीपेक्षा एक रुपयासुद्धा जास्त आकारू शकणार नाही. राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (NPPA) 27 मे 2026 पासून लागू होणारा हा आदेश जारी केला आहे. भारतातील औषधांच्या किमतींबद्दलची सर्वांत मोठी तक्रार हीच आहे की एकच औषध वेगवेगळ्या ब्रँड्सच्या नावांनी आणि खूप वेगवेगळ्या किमतींना विकलं जातं. एका मेडिकलमध्ये 15 रुपयांना मिळणारं औषध दुसऱ्या मेडिकलमध्ये 40 रुपयांना मिळू शकतं. त्यामुळे औषधांची योग्य किंमतच रुग्णांना किंवा ग्राहकांना माहीत नसते. शिवाय डॉक्टरांनी सांगितलेला ब्रँडच ते खरेदी करण्यास भाग पडतात. इतकंच नाही तर कंपन्या नवीन औषधं किंवा ज्यांच्या किमती सरकारने अद्याप निश्चित केलेल्या नाहीत, अशी औषधं त्यांना हव्या त्या किमतीला विकू शकतात. यामुळेच मधुमेह किंवा हृदयरोगसारख्या आजारांवरील औषधांचा मासिक खर्च हजारो रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

एनपीपीएच्या आदेशानंतर, सरकारने या 30 औषधांची एमआरपी निश्चित केली आहे. आता कोणतीही कंपनी किंवा मेडिकल असलं तरी कोणीही या औषधांसाठी निश्चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त दर आकारू शकणार नाही. जो कोणी दुकानदार जास्त दर आकारेल, तो कायद्याचं उल्लंघन करत असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

कोणत्या आजारासाठी कोणतं औषध कितीला मिळेल?

  • मधुमेह रुग्णांसाठी असलेली विल्डाग्लिप्टिन आणि मेटफॉर्मिनची कॉम्बो टॅब्लेट आता 9.79 रुपये प्रति टॅब्लेटपेक्षा जास्त दराने विकली जाणार नाही.
  • हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी बिसोप्रोलोल आणि अ‍ॅम्लोडिपिनच्या कॉम्बोची किंमत 7.31 ते 9.40 रुपये प्रति टॅब्लेट निश्चित करण्यात आली आहे.
  • सिटाग्लिप्टिन, ग्लिमेपिराइड आणि मेटफॉर्मिनची किंमत 10.39 रुपये ते 11.91 रुपये प्रति टॅब्लेट निश्चित करण्यात आली आहे.
    टेनेलिग्लिप्टिन आणि डॅपाग्लिफ्लोझिनच्या कॉम्बो टॅब्लेटची किंमत 10.17 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही औषधं दररोज घ्यावी लागत असल्याने, महिन्याला 30 गोळ्यांच्या हिशोबाने निश्चित केलेली किंमत 300 ते 360 रुपयांपेक्षा जास्त होणार नाही.
  • हाडांसाठी असलेल्या व्हिटॅमिन डी 3 ओरल सोल्युशनची किंमत 14.91 ते 15.88 रुपये प्रति मिली आहे. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी 3, मिथाइलकोबालामिन आणि एल-मिथाइलफोलेट कॅल्शियम असलेल्या संयुक्त टॅब्लेटची किंमत 19.78 रुपये आहे.
  • किडनी किंवा यकृत प्रत्यारोपणानंतर दिल्या जाणाऱ्या टॅक्रोलिमस प्रोलॉन्गड रिलीज कॅप्सूलची एमआरपी प्रति कॅप्सूल 127 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हे अत्यंत महागडं औषध मानलं जातं. आता त्याची किंमत निश्चित झाल्याने प्रत्यारोपण रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
  • सिल्निडिपिन आणि टेल्मिसार्टनच्या गोळ्यांची किंमत 12.98 ते 14.95 रुपये आहे. कोलेस्ट्रॉलवरील औषध ॲटोरवास्टॅटिन आणि फेनोफायब्रेटची किंमत 18.46 रुपये प्रति टॅब्लेट आहे.
  • ऍलर्जी आणि दम्यासाठीच्या बिलास्टीन आणि मॉन्टेलुकास्ट गोळ्यांची किंमत 21.22 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ताप आणि वेदनांसाठीच्या पॅरासिटामॉल, फेनिलेफ्राइन आणि क्लोरफेनिरामाइन गोळ्यांची किंमत फक्त 5.15 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

औषध खरेदी करताना त्यावर लिहिलेली एमआरपी आवर्जून तपासा. जर दुकानदार एमआरपीपेक्षा जास्त किंमत मागत असेल तर तुम्ही नकार देऊ शकता. याविरोधात जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर तुम्ही एनपीपीएच्या nppa.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा राज्य औषध नियंत्रक कार्यालयात तक्रार दाखल करू शकता.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in