• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

संसदेत गदारोळ ते बैठकांचा धडाका…दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या घडामोडी!

July 20, 2026 by admin Leave a Comment


कॉकरोच जनता पार्टीचे राजधानी दिल्लीत मोठे आंदोलन सुरू आहे. सीजेपीतर्फे संसद मार्चचे आंदोलन पुकारण्यात आले आहे. हजारो तरुण दिल्लीत जमा झाले असून शेकडो पोलीस या तरुणांना ताब्यात घेत आहेत. काही ठिकाणी पोलिसांनी तरुणांना मारहाणही केली आहे. दरम्यान, या आंदोलनाचे देशभरात पडसाद उमटत आहेत. राजधानी दिल्लीत नेमकं काय काय घडलंय? ते जाणून घेऊ या..

1) आंदोलनाचे संसदेत पडसाद

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे संसदेतही पडसाद उमटले. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांनी नीट पेपरफुटी आणि राम मंदिर कथित आर्थिक घोटाळा या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरलं. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर संसदेत गदारोळ झाला. विरोधक आक्रमक झाल्याने अनेक वेळा कामकाज तहकूब करावे लागले.

2) आम्ही मागे हटणार नाही

दुसरीकडे संसद मार्च आंदोलनात सहभागी झालेले आंदोलक संसदेकडे कूच करताना दिसले. काहीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांची होती. आंदोलकांवर लाठीचार्च करण्यात आला, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. परंतु तरुण आंदोलक मागे हटताना दिसले नाहीत.

3) अभिजित दीपके यांचे उपोषण मागे

दुसरीकडे सोनम वांगचूक तसेच अभिजित दीपके यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. परंतु आमचे आंदोलन सुरूच राहील, असे दीपके यांनी सांगितलेले आहे. त्यांनी पोलिसांकडून महिला आंदोलकांना मारहाण केली जात असल्याचा आरोप केला.

4) राजधानीत बैठकांवर बैठका

आंदोलकांचा पवित्रा लक्षात घेता सरकार अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा आणि सीजेपीच्या प्रतिनिधींची बैठक झालेली आहे. बैठकीत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. तर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, दिल्लीचे पोलीस कमीश्नर यांच्यात बैठक पार पडली.

5) अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यात बैठक

कॉकरोच जनता पार्टीचे हे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली आहे. त्यामुले आता भविष्यात काय काय घडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
  • पाकिस्तानचे नेते बिलावल भुट्टो, युरोपच्या राजकुमारीशी लग्न करणार ? सोशल मीडियावर हंगामा
  • Sadabhau Khot : ‘पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले’, मंत्रीपद न मिळाल्याने सदाभाऊ खोतांकडून खदखद व्यक्त
  • 31 August Horoscope : नोकरी, घर, पैसा, 4 राशींचे नशीब फळफळणार, वाचा आयुष्यात काय बदल होणार!
  • मोठी बातमी! हिंदू युवा वाहिनीच्या नेत्याची हत्या, कालव्यामध्ये आढळला मृतदेह

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in