• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’च्या सेटवर घडला मोठा अनर्थ; शूटिंगदरम्यान तंत्रज्ञाचा मृत्यू

June 22, 2026 by admin Leave a Comment


‘लव्ह अँड वॉर’ हा दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या करिअरमधील सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. यामध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्या मुख्य भूमिका आहेत. अशातच या चित्रपटाच्या सेटवरून एक मोठी बातमी समोर येत आहे. सेटवर काम करणाऱ्या एका टेक्निशियनचा अचानक विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याचं कळतंय. चंद्रधारी यादव असं त्या टेक्निशियनचं नाव आहे. जवळपास तीन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचं कळतंय. मुंबईतील फिल्मसिटीमध्ये ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. यावेळी सेटवर आलिया भट्टसुद्धा उपस्थित होती, असं समजतंय. हा अपघात घडला, तेव्हा आलिया तिच्या भागाचं शूटिंग करत होती.

भन्साळींच्या टीमकडून मदत जाहीर

या दु:खद घटनेनंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या प्रॉडक्शन कंपनीने चंद्रधारी यादव यांच्या कुटुंबीयांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. चंद्रधारी यादव यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी FWICE ने सेटवर अधिक कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. फेडरेशनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी ‘इंडिया टुडे/ आज तक’शी बोलताना सांगितलं, “आम्हाला नुकसान भरपाईची रक्कम 40 लाख रुपयांवरून 50 लाख रुपयांपर्यंत वाढवायची आहे.”

फेडरेशनची भूमिका

“त्याची मुलं अजून खूप लहान आहेत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज भासेल. आम्ही सेटवर अधिक कडक सुरक्षा उपाययोजना आणि कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांचं नियमन करण्याची मागणीही केली आहे. तो अत्यंत प्रतिभावान तंत्रज्ञ होता आणि त्याचं अशा प्रकारे झालेलं निधन अत्यंत दु:खद आहे”, असंही ते पुढे म्हणाले.

संजय लीला भन्साळी यांचा ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट बऱ्याच काळापासून लांबणीवर पडला आहे. खरंतर हा चित्रपट 2025 मध्येच प्रदर्शित होणार होता. मात्र नंतर प्रदर्शनाची तारीख 20 मार्च 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. याचं शूटिंग 2024-25 मध्येच सुरू झालं होतं. मात्र रणबीरच्या इतर प्रोजेक्ट्समुळे याचं काम रखडलं. आता प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा 20 मार्चवरून पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट 21 जानेवारी 2027 रोजी प्रदर्शित होईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी सरकारचा जीआर आला, 3000 मिळणार की 1500, मोठी अपडेट समोर!
  • राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
  • काय सांगता? 50 किलो कांदा खरेदी केल्यास पोलीस उचलून नेणार? नियमाने कुणाला फुटला घाम
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
  • कसोटी मालिकेत मानवने मॅजिक बॉलवर काढली प्रभात जयसूर्याची विकेट, सुथारच्या चेंडूचं सत्य काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in