
मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं बाई अरेच्चा’. या चित्रपटातील अनेक व्यक्तिरेखा आणि संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यातीलच एक छोटीशी भूमिका साकारणारी चिमुकलीही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती.
विशेष म्हणजे ही चिमुकली आता मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘ओ काका sss… मीच म्हणाले तुम्हाला वेडा, पण मनातल्या मनात बोलले. तुम्हाला कसं कळलं?’ असं म्हणत संजय नार्वेकर यांच्या पात्राला जीभ दाखवून पळून जाणारी ही चिमुकली म्हणजेच सना शिंदे.
तिच्या निरागस अभिनयामुळे आणि क्यूट अंदाजामुळे ती भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. सना शिंदे ही दिग्दर्शक केदार शिंदे यांची मुलगी आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सनानेही मराठी मनोरंजनसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ती अभिनेता अंकुश चौधरीसोबत झळकली.
सध्या सना वडील केदार शिंदे यांच्या चित्रपटांसाठी सहाय्यक म्हणूनही काम करत आहे. बालकलाकार म्हणून पडद्यावर दिसलेली सना आता अभिनयासोबतच चित्रपट निर्मितीच्या विविध पैलूंमध्येही काम करताना दिसत आहे.




Leave a Reply