
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी भाषेच्या सक्तीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पंडित संजय दुबे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. १५ ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्यदिनी, सरनाईक यांनी परप्रांतीय व्यक्ती मराठी न बोलल्यास त्यांचे टॅक्सी किंवा रिक्षाचे परवाने रद्द केले जातील, असा इशारा दिल्याचे दुबे यांनी म्हटले आहे.
संजय दुबे यांनी याला गुलामी लादण्यासारखे कृत्य म्हटले असून, हा प्रकार लोकशाहीविरोधी असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, “आजचा युवा वर्ग गुलामी पत्करणार नाही.” दुबे यांनी सरनाईक यांना आव्हान देत म्हटले की, जर अशी जबरदस्ती केली गेली, तर संजय दुबे कधीही मराठी बोलणार नाही. मराठी बांधवांबद्दल आदर व्यक्त करत असतानाच, त्यांनी सहनशाहीच्या नावाखाली होणाऱ्या सक्तीला विरोध दर्शवला. ही सरकार लवकरच कोसळेल, असा दावाही त्यांनी केला.
Leave a Reply