• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शेवटच्या षटकातील थरार..! कर्णधार प्रभसिमरन सिंहच्या भांगडा नृत्याने जिंकली उपस्थितांची मनं Video

September 9, 2026 by admin Leave a Comment


शेर ए पंजाब टी20 लीग 2026 स्पर्धेत जालंधर वॉरियर्स आणि लुधियाना लायन्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात जालंधर वॉरियर्सने 7 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना जालंधर वॉरियर्सने 20 षटकात 8 गडी गमवून 169 धावा केल्या. जालंधर वॉरियर्सची सुरूवात खराब झाली होती आणि 20 धावांवर 3 गडी गमावले होते. मात्र त्यानंतर जालंधर वॉरियर्सने डाव सावरला. कर्णधार प्रभसिमरन सिंगने 39 धावा केल्या. गौरव मार्कन आणि आर्यन यादवने 42 चेंडूत 65 धावांची भागीदारी केली. गौरव मार्कनने 52 धावा केल्या, तर आर्यन यादवने नाबाद 35 धावांची खेळी केली. लुधियाने लायन्सचा गोलंदाज क्रिश भगतने चार षटकात 36 धावा देत 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरात, लुधियाना लायन्सने 20 षटकात 8 गडी गमवून 162 धावा केल्या. खरं तर शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना कोणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता होती. शेवटच्या षटकात लुधियाना लायन्सला 10 धावांची गरज होती.

शेवटच्या षटकात काय झालं?

लुधियाना लायन्सला शेवटच्या षटकात 10 धावांची गरज होती. कर्णधार प्रभसिमरन सिंगसमोर मोठा पेच होता की षटक कोणाला द्यायचं? पण त्याने युवा फिरकीपटू रणदीप सिंग यांच्याकडे चेंडू सोपवला. त्यामुळे त्याच्याकडे 10 धावा रोखण्याचं मोठं आव्हान होतं. त्याने चेंडू हाती घेतला आणि पहिल्याच चेंडूवर विकेट काढली. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला. दुसऱ्या चेंडू टाकला आणि निर्धाव गेला. त्यामुळे लुधियाना लायन्सच्या फलंदाजावर दबाव वाढला. 4 चेंडूत 10 धावा अशी स्थिती आहे. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने आणखी एक विकेट काढली आणि सामना 3 चेंडूत 10 अशा स्थितीत आला. चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर प्रत्येकी एक धावा आली. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर 8 धावांची गरज होती. पण हा चेंडूही निर्धाव गेला आणि सामना जालंधर वॉरियर्सच्या पारड्यात पडला.

What a match 🔥

Prabhsimran Singh Absolute masterclass in captaincy.

Defended 10 runs in the last over handed the ball to young spinner Randeep Singh

W,0,W,1,1,0

Prabhsimran doing bhangra after the win. Rare & beautiful moment #Prabhsimran #PunjabKings #PBKS pic.twitter.com/s4Jt1S7P1Z

— Harinder Singh Brar (@harry7081) September 8, 2026

 

View this post on Instagram

 

A post shared by Sher-E-Punjab T20 League (@sherepunjabt20)

रोमहर्षक विजयानंतर कर्णधार प्रभसिमरन सिंगने जल्लोष केला. त्याने मैदानात भांगडा करून आपला आनंद साजरा केला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रभसिमरन सिंगने शेर ए पंजाब टी20 लीग स्पर्धेच्या सात सामन्यात 203.36 च्या स्ट्राईक रेटने 484 धावा केल्या. त्याने या स्पर्धेत 47 चौकार आणि 29 षटकार आहे.

 





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 80s Photo Trend : 80s फोटो ट्रेंड सुपरहिट; पण फोटो बनवताना सावधान! ‘या’ चुका टाळा, नाही तर…
  • मोठी बातमी! ज्याची भीती होती तेच घडलं, इराणचा अमेरिकेला सर्वात मोठा झटका, आता ट्रम्प काय करणार? जगाचं लक्ष
  • नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज मनोज जरांगे यांच्या भेटीला, मोठ्या घडामोडी….
  • व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता…
  • Amruta Fadanvis : ते माझे भाऊ; अमृता फडणवीसांचं जरांगें पाटलांना जेवणाचं निमंत्रण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in