• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शिवसेनेला जेमतेम 4 जागा, त्यातही… गुलाबराव पाटलांनी नराजीच्या सुरात सगळंच सांगितलं

June 4, 2026 by admin Leave a Comment


विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महायुतीतील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जळगावची जागा भाजपकडे गेल्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या.

गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर आजची परिस्थिती वेगळी असती. मोठ्या भावाने लहान भावाकडे नीट लक्ष द्यावे, अशी अपेक्षा सर्वांची असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नाशिकमध्ये होत असलेली बंडखोरी महायुतीच्या भविष्यासाठी योग्य नसल्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, त्यांच्या एका वक्तव्याने विशेष लक्ष वेधलं. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, 5  जागांची सिटींग होती तरी  शिवसेनेला जेमतेम 4 जागा मिळाल्या. त्यातही बंडखोरी होणे चुकीचे आहे. वरिष्ठांचा निर्णय मान्य करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदेंचे थेट आदेश..
  • Aaditya Thackeray : फेकनाथ मिंधे..सगळे रात्रीचे खेळ..आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंच्या जिव्हारी लागणारे शब्द
  • पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्… पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजेंबाबत मोठं विधान; महायुतीत आता…
  • किसिंग सीन दरम्यान 20 वेळा रिटेक, रागात नंतर अभिनेत्रीने जे केलं ते ऐकून व्हाल थक्क
  • आदेश बांदेकर पुन्हा दिसणार मालिकेत! प्रोमोने वेधले लक्ष, मालिकेचे नाव काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in