• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शिवसेना कुणाची? आज सिब्बल यांची फायनल बॅटिंग, कोणते अस्त्र काढणार? मोठा ट्विस्ट येणार?

August 19, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. आज सिब्बल हे अंतिम युक्तिवाद करणार आहेत. त्यांच्यासोबत देवदत्त कामत हे ठाकरे गटाची बाजू मांडण्याची शक्यता आहे. आजच्या सुनावणीत सिब्बल कोणते मुद्दे मांडतात? कोणत्या मुद्द्यावर भर देतात आणि आज शेवटच्या दिवशी ठेवणीतील कोणतं अस्त्र काढतात याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. सिब्बल आजच्या युक्तिवादात ट्विस्ट येणारा मुद्दा मांडतात का? एखाद्या केसचा संदर्भ देऊन ठाकरे गटाची बाजू भक्कम करतात का? याकडेही संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत, व्ही. मोहना आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठात शिवसेनेवर सुनावणी सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. शिवसेना फुटीपासून ते विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेपर्यंतच्या विविध मुद्द्यांवर सिब्बल यांनी भाष्य केलं आहे. समाजवादी पार्टीतील फूट, सुभाष देसाई प्रकरण आणि इतर केसेसचा दाखला देत सिब्बल यांनी आपले मुद्दे कोर्टासमोर मांडले आहेत. आज सिब्बल यांचा युक्तिवाद संपुष्टात येईल. हा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे गटाचे वकील त्यांची बाजू मांडतील. त्यांनाही कोर्टाकडून आठ दिवसांचा अवधी दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी सिब्बल काय मुद्दे मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आतापर्यंत काय घडलं?

गेल्या आठ दिवसापासून कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करत आहेत. सिब्बल यांनी पक्ष फुटीपासून ते निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेपर्यंतचे मुद्दे कोर्टात मांडले आहेत. विधीमंडळातील फूट ही पक्षातील फूट मानूनच निकाल दिला गेल्याचंही त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. सुरतला आमदार गेले. तेव्हाच ठाकरे गटाने या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी पत्र दिलं होतं. पण त्या पत्राची दखल घेतली गेली नाही. जेव्हा एक तृतियांश आमदार बाहेर पडले, तेव्हा निकाल दिला गेला आणि विधीमंडळातील फुटीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे आमदार अपात्र होऊ शकले नाही. परिणामी ठाकरेंच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेल्याचंही सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.

चार मुद्द्यांवर भर

सिब्बल यांनी बाजू मांडताना चार गोष्टींवर अधिक भर दिला. अपात्रता, पक्षाची घटना, निवडणूक आयोगाचे अधिकार आणि विधानसभा अध्यक्षांचे कार्यक्षेत्र या चार मुद्द्यांवर सिब्बल यांनी भर दिला होता. आता सिब्बल यांचे हे चारही मुद्दे शिंदेंचे वकील कसे खोडून काढतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काल काय घडलं?

कालच्या सुनावणीवेळी सिब्बल यांनी अपात्रतेच्या मुद्द्यावर भर दिला होता. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यक्षेत्रावरच हल्ला चढवला होता. विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अधिकाराच्या पलिकडे जाऊन निर्णय दिला. त्यांनी दहाव्या अनुसूचिच्या चिंधड्या उडवल्या, असं सिब्बल यांनी सांगितलं. विधानसभा अध्यक्षांनी विधीमंडळातील फूट हीच संघटनेतील फूट मानून निर्णय दिला. तर हीच फूट ग्राह्य समजून निवडणूक आयोगाने शिंदेंकडे पक्ष आणि पक्ष चिन्ह दिलं. तसेच आधीच मूळ शिवसेनेचा प्रतोद असताना कोणत्या कायद्याच्या आधारे भरत गोगावले यांना विधानसभा अध्यक्षांनी व्हीप नेमले? असा सवालही सिब्बल यांनी केला. सिब्बल यांचे हे मुद्दे शिंदेंचे वकील कसे खोडणार? आणि शिंदेंची बाजू मांडणारे कोणते मुद्दे मांडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in