
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ज्येष्ठ वकील देवदत्त कामत युक्तिवाद करत आहेत. आज पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे कसे वेगळे आहेत याबाबत युक्तिवाद करण्यात आला. देवदत्त कामत यांनी म्हटले की, ‘ज्या निकालांमध्ये अपात्रता योग्य ठरवली गेली आहे, तिथे सर्वोच्च न्यायालयाने स्वतः अपात्र घोषित केले आहे.’ यावर न्यायमुर्ती बागची यांनी आम्ही स्वतः शिंदे यांना अपात्र घोषित करू शकतो का? असा सवाल कामत यांना विचारला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply