• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शिंदेंच्या या खासदाराला 100 टक्के मंत्रिपद? मोंदीच्या मंत्रिमंडळात…थेट विधानाने चर्चेला उधाण!

August 22, 2026 by admin Leave a Comment


Narendra Modi Cabinet Expansion : लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पडद्यामागे तशा हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. याच संभाव्य मंत्रिमंडळाचा विस्तार लक्षात घेता महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची दिल्लीवारी सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वाट्यालाही काही मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या सहा बंडखोरी करून थेट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन सामील होण्याचा निर्णय घेतल्यानं यापैकी एखाद्या खासदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते, असे बोलले जात आहे. याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेले असतानाच आता बंडखोर खासदारांपैकी एका खासदाराने मला मंत्रिपद मिळेल असे 100 टक्के वाटते, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

तो खासदार नेमकं काय म्हणाला?

ठाकरे गटातून बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेल्या एकूण 6 खासदारांमध्ये परभणीचे खासदार बंडू जाधव यांचाही समावेश आहे. त्यांनी परभणीत नुकतेच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. याच वेळी त्यांनी संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावरही प्रतिक्रिया केली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला काही माहिती नाही. भाजपाचे नेते याबाबत ठरवतील. माझ्या पक्षाने मंत्रिपदासाठी माझं नाव सुचवलं तर मला संधी मिळेल. मला मंत्री म्हणून संधी मिळण्याची 100 टक्के शक्यता आहे. तसं मला वाटतं, असं मोठं विधान यावेली बंडू जाधव यांनी केलं.

जे नाव नेता ठरवेल…

तसेच, माझ्यासोबत जेवढे कासदार आहेत, त्या सर्वांनांच मला मंत्रिपद मिळेल असं वाटतं. ओमराजे निंबाळकर असतील किंवा अन्य कोणी खासदार असेल त्या सर्वांनाच मंत्रिपद मिळेल असं वाटतं. एखाद्याला असं वाटणं सहाजिक आहे. परंतु जे नते ठरवतील तेचं नाव फायनल होत असतं, असंही पुढे संजय जाधव यांनी स्पष्टीकरण दिलं.

केंद्रात नेमकं कोणाला संधी मिळणार?

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमडंळ विस्तारादरम्यान बरेच मोठे आणि महत्त्वाचे फेरबदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही खासदारांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, असं बोललं जातंय. शिंदे गटाच्या वाट्यालाही एक केंद्रीय मंत्रिपद तसेच एक राज्य मंत्रिपद येऊ शकतं. दरम्यान, या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून कोणाला लॉटरी लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in