• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शरद पवारांबरोबरच्या बैठकीत काय घडलं? पार्थ पवार काय म्हणाले? अखेर बातमी आली समोर

August 22, 2026 by admin Leave a Comment


पार्थ पवार यांच्या वरळीतील शुभदा निवासस्थानी आज राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ऑनलाईन हजेरी लावली. यावेळी राज्यातील परिस्थिती, पक्षांतर्गत वादावर चर्चा झाली. यावेळी पक्षातील नेत्यांनी पार्थ पवार यांना शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली? दोघांमध्ये काय ठरलं? असा सवाल केला. त्यावर पार्थ पवार यांनी फार काही नाही म्हणत या प्रश्नाला बगल दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पार्थ पवार यांनी काल रात्री राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. आज पुन्हा त्यांनी वरळीच्या शुभदा निवासस्थानी नेत्यांची बैठक घेतली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थितीत होत्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला जय पवारही उपस्थित होते. तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत पक्षाच्या अंतर्गत वादावर चर्चा झाली. पक्षातील अंतर्गत वाद मिटवून लोकांसमोर जाण्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं.

वैयक्तिक विषयांवर चर्चा

दोन दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली होती. तब्बल तीन तास त्यांच्यात चर्चा झाली. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. आजच्या बैठकीत या भेटीचा मुद्दा उपस्थित झाला. पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या बैठकीत काय नक्की चर्चा झाली? अशी नेत्यांनी विचारणा केली. त्यावर पार्थ यांनी काही खास चर्चा नाही. वैयक्तिक विषयांवर चर्चा झाल्याचं पार्थ यांनी सांगितलं.

सच्चिदानंदांवर कारवाई होणार

सच्चिदानंद सिंह यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. सचिदानंद सिंह यांनी पक्ष विरोधी कारवाई केल्याचे मत नेत्यांनी व्यक्त केलं. पक्षात काही अडचण असेल तर वरिष्ठांना सांगा. अशा पद्धतीने पत्र लिहिणे योग्य नाही, असं मत नेत्यांनी व्यक्त केलं. या पत्राला लवकरच पक्षाकडून उत्तर दिले जाणार असून सच्चिदानंद सिंह यांच्यावर देखील कारवाई करण्याचे संकेत बैठकीत देण्यात आले आहेत.

राज्यव्यापी चर्चा

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या बैठकीबाबतची माहिती दिली. पक्षाच्या बैठकीत संघटनात्मक चर्चा झाली. अजून काही स्थानिक पातळीवरचा बैठका झाल्या होत्या. आज आम्ही व्यापक चर्चा केली. सविस्तर चर्चा झाली. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आाणि संपूर्ण राज्याच्या संघटनेच्या दृष्टीने चर्चा झाली, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं. तसेच सच्चिदानंद सिंह यांच्यावर जी कायदेशीर कारवाई करायची ती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रशांत किशोर नव्हते

यावेळी त्यांना पक्षातील अंतर्गत दुफळीबाबत विचारण्यात आलं. त्यावर, तुमच्या कल्पनेतच दुफळी असेल तर काय बोलणार? आमच्यात कधी दुफळी नव्हती, असं तटकरे म्हणाले. या बैठकीला प्रशांत किशोर नव्हते, अशी माहितीही त्यांनी दिली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in