• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वैभव सूर्यवंशी या कार्टूनच्या प्रेमात… हे कार्टून कॅरेक्टर पाहताच येतो जोश… मैदानावर करतो तुफान फटकेबाजी

June 7, 2026 by admin Leave a Comment

Vaibhav Suryavanshi Favorite Cartoon Chhota Bheem: भारतीय टी 20 संघातील तरुण चेहरा वैभव सूर्यवंशी स्वतःला शांत ठेवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी एक खास पद्धत वापरतो. तो मैदानात उतरण्यापूर्वी त्याचे आवडते कार्टून ‘छोटा भीम’ पाहतो. त्यानंतर मैदानावर गोलंदाजांची धुलाई करतो. वैभव छोटा भीम हे कार्टून पाहत असल्याचा खुलासा उद्योगपती हर्ष गोयनका यांनी केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्याची तुफान चर्चा होत आहे.

या महिन्याच्या अखेरीस वैभव सूर्यवंशी याची इंग्लंड आणि आर्यलंडविरोधात होणाऱ्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. आयपीएल 2026 मधील त्याच्या दमदार खेळीमुळे तो चर्चेत आला आहे. सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमच नाही तर इतरही अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. वैभव सूर्यवंशी रोज काय डाएट पाळतो. तो इतक्या कमी वयात कसा फिट राहतो याची चर्चा सुरू असतानाच तो कोणते कार्टून पाहतो याचीही चर्चा रंगली आहे.

छोटा भीम किती मोठा ब्रँड?

छोटा भीम केवळ एक कार्टून कॅरेक्टर नाही, तर भारतातील सर्वात मोठ्या ॲनिमेशन ब्रँड्सपैकी एक आहे. या फ्रँचायजीला राजीव चिलाका यांनी तयार केले आहे. ग्रीन गोल्ड ॲनिमेशनचे ते संस्थापक आहेत. छोटा भीमचे अंदाजे मूल्य 500 कोटी रुपयांहून अधिक आहे. तर त्याची पालक कंपनी ग्रीन गोल्ड ॲनिमेशनचे मूल्य जवळपास 800 कोटी रुपये इतके आहे. तर इतर माध्यमातून सुद्धा कोट्यवधींची कमाई होते.

Did you know what the young sensation Vaibhav Suryavanshi does before a match to stay calm and focused? He watches his favourite Chhota Bheem cartoons on his phone! 😊
So happy to know that he is holding on to his childhood.

— Harsh Goenka (@hvgoenka) June 6, 2026

हर्ष गोयनका यांचा गंमतीशीर खुलासा

हर्ष गोयनका यांनी सोशल मीडियावर याविषयीचा एक गंमतीशीर खुलासा केला आहे. त्यांनी एक पोस्ट केली आहे. त्यानुसार, मैदानावर स्फोटक फलंदाजी करणारा वैभव सूर्यवंशी सामन्यापूर्वी शांत आणि फोकस्ड राहण्यासाठी त्याचे आवडते कार्टून छोटा भीम पाहतो. त्यामुळे त्याने अजूनही बालपण जपून ठेवल्याचे गोयनका यांनी म्हटले आहे.

क्रिकेटच्या मैदानात दमदार कामगिरीसाठी प्रत्येक खेळाडूनर मोठा दबाव असतो. माध्यमांची नजर आणि सतत कामगिरीवर लक्ष यामुळे खेळाडू तणावाखाली असतो. ही आव्हानं त्याला मानसिकरित्या थकून टाकतात. त्यामुळेच वैभव हा छोटा भीम कार्टन पाहतो आणि स्वत:ला खूष ठेवतो.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in